रत्नागिरी हापूस मार्केट यार्डात दाखल : पाच डझनाच्या एका पेटीस ३१ हजार दर


पुणे : कोकणातील रत्नागिरी हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या. या पाच  डझनाच्या या पेटीला तब्बल ३१ हजार रूपये भाव मिळाला. देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. त्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा मार्केट यार्डात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून शेतकरी मकरंद काने यांच्या बागेतून मे. गणेश फ्रुट एजन्सी, अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर पाच पेट्या शुक्रवारी आल्या होत्या. लिलावात व्यापारी युवराज काची यांनी तब्बल ३१ हजार रुपयांना एक पेटी याप्रमाणे खरेदी केल्या. बाजार आवारातील ज्येष्ठ असते एकनाथ यादव, अडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, रावसाहेब कुंजीर, सुनील वंजारी, जगणाथ वंजारी, विनोद परदेशी, सुधीर मनुसुख, माणिक ओसवाल, हमजू भोले, अब्दुल चौधरी, निलेश शिंदे यांच्यासह बाजारातील अडते उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची 'ईडी'मार्फत चौकशी : रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?