राजकारणात ‘इंटेलिजेंस कोशियंट’पेक्षा भावनिक गुणधर्म महत्वाचे


पुणे- “राजकारणात इंटेलिजेंस कोशियंटपेक्षा भावनिक गुणधर्म अधिक महत्वाचा आहे. Emotional qualities are more important in politics than ‘intelligence coefficient’ आपल्यावर होणार्‍या टीकांना सकारात्मकेतेने स्वीकारून त्याचे उत्तर समर्पित कार्याद्वारे दयावे. तसेच, राजकारणात अंतिम लक्ष लोकांसाठी काम करणे हे आहे हे सदैव ध्यानात ठेवावे.” असा सल्ला भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार अपराजित सारंगी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १६ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा २४ मार्च पयर्र्त दिल्ली येथे राष्ट्रीय अभ्यास दौरा सुरू आहे. मिटसॉगचे प्राध्यापक परिमल सुधाकर आणि संकल्प संघई हे या दौर्‍याचे नेतृत्व करीत असून यामध्ये २२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या अभ्यास दौर्‍यात देश पातळीवरील राजकारणाची आणि सरकारची इत्यंभूत माहिती मिळविणे, संसदेचा कारभार, राजकीय पक्षांच्या कार्यालयाची भेट, राष्ट्रीय नेत्याशी संवाद साधणे या अभ्यास दौर्‍याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोग, नीति आयोग, विविध मंत्रालये येथील अधिकार्‍यांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
त्यानुसार १० मार्च रोजी विद्यार्थ्यांनी भारतातील प्रजासत्ताक कोरियाचे राजदूत अं. शिन बोंगकिल, दिल्लीचे माजी आमदार कपिल मिश्रा, राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाचे मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्याशी विशेष भेट त्या त्या विभागाच्या माध्यमातून चालविल्यात येणार्‍या कार्याची माहिती घेतली.  यावेळी अं. शिन बोंगकिल यांनी दक्षिण कोरिया करीत असलेल्या गुंतवणूकीवर विचार मांडले. भारतीय लोकशाहीचे कौतुक केले. राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर यांनी शहरी व ग्रामीण भागातील वाढत जाणारे अंतर आणि गरीबीसमोरील आव्हाने यावर त्यांनी भाष्य केले. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की राजकारणात येतांना आपली विचारसरणी आणि तत्वांवर कधीही तडजोड करू नका. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सक्षम बनावे.
त्यानंतर ११ मार्च रोजी म्हणजेच तिसर्‍या दिवशी या अभ्यास दौर्‍यातील विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाची अविभाज्य शाखा इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॉसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटला भेट देऊन येथील कार्यपद्धती समजवून घेतली.
एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांना भेटल्यानंतर त्यांनी  राजकारणातील खाचे खळगे समजावून सांगितले. नंतर आयुष मंत्रालयाला भेट दिल्यानंतर ते सरळ राज्यसभेचे द्रमुक सदस्य तिरूची शिव यांना भेटले. त्यांनी विद्यार्थ्यांना राजकारणातील मुलभूत गुणांवर जोर देऊन सहिष्णूता, संयम, धैर्य आणि दृढनिश्चय हे गुण अंगी आणण्याचा सल्ला दिला. माजी आयआरएस अधिकारी व खासदार श्रीमती सुनीता दुग्गल यांच्या संवाद साधतांना महिला सबलीकरणावर जोर देण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रीय दौर्‍याच्या चौथ्या दिवशी या विद्यार्थ्यांनी लोकसभा सदस्य श्रीमती अपराजिता सारंगी, मुख्य माहिती अधिकारी वाय. के. सिन्हा आणि भारताचे कुलसचिव आणि जनगणना आयुक्त डॉ.विवेक जोशी यांच्या संवाद साधला.
यावेेळी वाय.के सिन्हा यांनी कायदा, उपद्रव आणि आरटीआय कायद्याची चौकट योग्य दिशेने कशी सुरू आहे हे सांगितले. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयांवर अवलंबून आहे असे ही ते म्हणाले.
विवेक जोशी यांनी लोकसंख्या मोजणीची कार्यपद्धती सांगितली. प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचा डेटा संकलित कार्यपद्धतीची माहिती दिली. लोकशाहीचा पाया जनगणना हे ही समजावून सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार