एकनाथ खडसेंनाही होणार अटक?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–“भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा (ED) तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.

पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ज्या पद्धतीने ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे, त्यावरून आता एकनाथ खडसे यांना आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते आणि त्यांनतर अटक होण्याची शक्यता वाढली आहे, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील  न्यायालयात असीम सरोदे हे एकनाथ खडसे यांच्याविरोधात ही केस लढवत आहेत. या प्रकरणाची जी उपलब्ध कागदपत्रं आहेत, त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी असल्याचं मतही अ‍ॅड. सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमुल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी, की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *