भारतात इबोलाचा शिरकाव? आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा 

भारतात इबोलाचा शिरकाव
भारतात इबोलाचा शिरकाव

नवी दिल्ली: आफ्रिकेतून आलेल्या एका महिलेमुळे भारतात इबोला विषाणूची एन्ट्री झाल्याची भीती निर्माण झाली असतानाच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे. युगांडाहून बेंगळुरूमध्ये आलेल्या एका २८ वर्षीय महिला प्रवाशाला इबोलाच्या संशयावरून क्वारंटीन करण्यात आले होते, मात्र पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या तिच्या रक्ताचा नमुना आता ‘इबोला निगेटिव्ह’ आला आहे. या अहवालामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला असून, भारतात सध्या इबोलाचा एकही संसर्ग बाधित रुग्ण नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्या मध्य आफ्रिकेतील कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तेथे आणीबाणी घोषित केली आहे. इबोला हा जगातील सर्वात घातक विषाणूंपैकी एक मानला जातो, कारण या आजारात मृत्यूचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांपर्यंत असते. विशेष चिंतेची बाब म्हणजे या आजारावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही; त्यामुळे बाधितांपासून दूर राहणे आणि स्वच्छतेचे कडक नियम पाळणे हाच यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.

अधिक वाचा  कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

इबोलाची लक्षणे आणि प्रसार

इबोला विषाणूचा प्रसार बाधित व्यक्तीच्या रक्त, घाम किंवा लाळेच्या संपर्कात आल्यामुळे होतो. या आजाराची प्राथमिक लक्षणे म्हणजे:

  • अचानक तीव्र ताप येणे

  • स्नायू दुखणे आणि प्रचंड थकवा जाणवणे

  • घसा खवखवणे

जर हा आजार बळावला, तर रुग्णाला उलट्या आणि जुलाब सुरू होतात, तसेच किडनी आणि यकृत निकामी होऊन शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका निर्माण होतो. भारतात सध्या कोणताही रुग्ण नसला तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत आरोग्य विभाग सतर्क असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love