सिंहगडावर ई-बसला अपघात : मोठा अनर्थ टळला : आठवडाभरात तिसरी घटना


पुणे- सिंहगड घाट रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याच्या आणि हवा प्रदूषणही कमी करण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 8 मेला बसला चार्जिंग नसल्याने घाटात बस बंद पडून नागरिकांचे हाल झाल्याची ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मोठी घटना घडता घडता वाचली आणि बसमधील पर्यटक बाल बाल बचावले.  अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

सिंहगडावर ज्या ठिकाणी अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत होती तिथेच गडावरुन आलेली बस थेट कठडयाला धडकली. मात्र, सुदैवानं तो कठडा मजबूत होता म्हणून ही बस आतकरवाडीच्या दरीत कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सिंहगडावर अपघात होता होता वाचण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. सिंहगडावर आलेल्या पर्यटकांचे सुदैव म्हणून मोठी दुर्घटना टळली अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

अधिक वाचा  ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाचे न्यायालयाने पुनरावलोकन करावे -प्रकाश आंबेडकर

सिंहगडावर सुट्ट्यांच्या दिवशी घाटरस्त्यात लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, तासन्‌‌तास रेंगाळणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी वन विभागाने गडावर जाणारी खासगी वाहने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. घाट रस्त्यावर ‘पीएमपी’ने केलेल्या ई-बसच्या चाचण्याही यशस्वी झाल्या होत्या. मात्र, या ई बस सेवेचा पुरा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love