अहो आश्चर्यम् : कोरोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टरांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह ..


पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांशी थेट संबंध येत असल्याने पहिल्यांदा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातही लसीकरण सुरू आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये गेल्या आठवड्यात या निवासी डॉक्टरला लस देण्यात आली होती. लसीकरण करण्यापूर्वी या डॉक्टरला कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे या डॉक्टरला आठ दिवसांपूर्वी लस देण्यात आली खरी परंतु काही दिवसांनंतर या डॉक्टरला अंगदुखी, सर्दी, खोकला असि लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली . त्यामध्ये ते कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले.

अधिक वाचा  पुणेकरांची चिंता वाढली: दिवसभरात पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

दरम्यान, हे डॉक्टर लस घेण्यापूर्वी बाहेर गावी प्रवास करून आले असल्याची माहिती मिळाली. त्यांना त्यावेळी कुठलीही लक्षणे न दिसल्याने लस देण्यात आली. मात्र, लसिकरण करण्याअगोदरच त्यांना कोविड-19 विषाणूचा  संसर्ग झाला असल्याचे आणि म्हणून त्याची लक्षणे नंतर दिसून येत असल्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या डॉक्टरांवर सध्या उपचार सुरू आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love