लायन्स क्लबच्या वतीने आदिवासी कातकरी कुटुंबाना ‘अन्नधान्य किट’चे वाटप


पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने पानशेत भागातील कुरण व सोनापूर येथील आदिवासी कातकरी कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

‘एक घास’- वंचितांसाठी हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत  लायन्स क्लबच्या वतीने रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अन्नधान्य वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. किटमध्ये साखर, कांदापोहे, खोबरे,मिरची पावडर, हळदी पावडर, मुगडाळ,तूरडाळ,मीठ,लक्स साबण आदी जीवनोपयोगी वस्तूंचा समावेश होता.

लायन्स ऑक्टोबर विशेष सेवा सप्ताह अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन महेश गायकवाड, सेक्रेटरी लायन मधुकर कोटा, खजिनदार लायन प्रकाश कुलकर्णी, लायन सीमा कुलकर्णी, मिताली कोटा, तन्मय गायकवाड व  कुरण गावचे सरपंच अमित ठाकर हे उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या  षडयंत्रात 'उबाठा' ही सहभागी - माधव भांडारी यांचा हल्लाबोल