धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांबाबत तसेच राजकीय नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट : गुन्हा दाखल


पुणे- मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट करुन त्यांची बदनामी करणार्‍या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल मुळे असे फेसबुक प्रोफाईल नाव असलेल्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ एप्रिल २०२१ पासून सुरु होता. राहुल मुळे या फेसबुक वापरकर्त्याने त्याच्या खात्यावरुन वेगवेगळ्या अश्लिल व घाणेरड्या भाषेमध्ये पोस्ट केल्या.

तसेच त्याच्या काही पोस्टला रिप्लाय देणार्‍या लोकांना प्राण्यांचे पार्श्वभागाचे फोटो टाकून अश्लिल व घाणेरड्या भाषेमध्ये रिप्लाय दिला आहे. त्यात काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये दृष्टता द्वेषाची भावना निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट टाकून चितावणीखोर भाष्य करुन पोस्ट केली आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली आहे.

अधिक वाचा  तडीपार गुंडाने केली पोलिस कर्मचाऱ्यांची गळा चिरून हत्या

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, अनिल देशमुख, संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मेटकरी, रोहित पवार यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट करुन कमेंटमध्ये बदनामीकारक पोस्ट केल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love