सायकलपटू प्रियंका जाधवच्या चाकांना मिळाली प्रोत्साहनाची गती


पुणे- गेली सात वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराच्या सायकल स्पर्धांचे विजेते पद मिळविले. सहा वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरवले. आर्थिक परिस्थिती बेताचीच त्यात कोरोनाचे सावट. यामुळे घरी परतलेल्या प्रियंका जाधवला गेले वर्षभर सायकल व सरावापासून वंचित राहावे लागले. मात्र आता तिच्या सायकलीच्या आणि स्वप्नांच्या चाकांना गती मिळाली आहे. राज्यातील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजक, क्रीडा संघटक व सिम्बायोसिस क्रीडाभूषण पुरस्काराने सन्मानीत अनिरुद्ध देशपांडे यांनी तिची दखल घेत राष्ट्रीय रोड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी योग्य रेसिंग सायकल तीला भेट दिली आहे.

शाळेच्या स्पर्धांमध्ये सहज म्हणून सहभागी झालेली प्रियंका आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू झाली आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभाग व विजय मिळवत मजल दर मजल करत दिल्लीतील क्रीडा प्रशिक्षण कँपमध्ये प्रवेश मिळवला. तेथे उत्तम प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्याने ७ सुवर्णपदक, ७ रौप्यपदक यासह केरळ येथे झालेल्या नॅशनल ट्रॅक चॅम्पियनशीप २०१६ चे सुवर्णपदक जिंकत एक नवे रेकॉर्ड तिच्या नावे नोंदविले गेले आहे. अशा या पुण्याच्या सुकन्येला केवळ परिस्थितीमुळे आपल्या स्वप्नापासून गेले वर्षभर दूर रहावे लागत होते. मात्र आता तिच्या स्वप्नांना चालना देत येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय रोड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी आवश्यक अशी सायकल अमनोरा येस फाउंडेशनच्या वतीने तिला भेट देण्यात आली आहे.

अधिक वाचा  दुहेरी हत्याकांडाने पुण्यात खळबळ: आईचा मृतदेह सासवड तर चिमूकल्याचा कात्रज बोगद्याजवळ आढळला ; पती बेपत्ता असल्याने गुढ वाढले

‘सेर्वेलो पी३’ नावाची ही रेसिंग सायकल सुमारे ५ लाख रुपये किमतीची असून ३टी अलॉय स्टेम, झीप अलॉय हँडल बार, ३टी अलॉय क्लिप ऑन एक्स्टेंशन, लिव्हर स्राम ब्रेक, ११ स्पीडचा शिफ्टर स्राम, ब्रेक कॅलीपर स्राम फोर्स, सॅडल फिजीक, बीबी राईट सेर्वेलो, क्रँक स्राम फोर्स, एफडी स्राम फोर्स, आरडी स्राम फोर्स, पीसी ११३० चे चेन स्राम, पीजी ११३० चे कॅसेट स्राम, व्हीट्टोरिया अल्युजन अलॉयची चाके, व्हीट्टोरिया रबरिंगचे टायर आणि व्हीट्टोरिया ट्यूब अशा तांत्रिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही सायकल खास स्पर्धांसाठी उपयुक्त आहे. ही सायकल अंतराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी देखील पूरक असून पुढील ४-५ वर्षे सहज वापरता येईल असे, प्रियंकाने सांगितले. 

याविषयी भावना व्यक्त करताना प्रियंका म्हणाली, “आधी सरकारी कँपमध्ये होते तेंव्हा तिथलीच सायकल आणि मार्गदर्शन मिळत होते. परंतु तेथून बाहेर पडल्यावर वैयक्तिक सायकल नसल्याने सरावात खंड पडला. आता अनिरुद्ध देशपांडे सरांच्या मदतीने मला वैयक्तिक सायकल मिळाली. नवी उभारी मिळाली आहे. आता पुन्हा नव्या जोमाने सराव करून येत्या राष्ट्रीय स्पर्धेतही पुण्याचा ठसा उमटवायचा आहे.”

अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट : ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा : बाहेर न पडण्याचे आवाहन

देशपांडे म्हणाले, “ग्रामीण भागातील गुणवत्ता असलेल्या विद्यार्थिनींमध्ये जिद्द असते. अशा मुलींना वेळेवर मदत केली तर त्या क्रीडा, शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात असा विश्वास वाटतो. तिला सायकल देत तिची गरज पूर्ण करून प्रोत्साहन देत आहोत. अमनोरा येस फाउंडेशन सामाजिक दरी कमी करण्याचेच काम करत आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love