ध्रुव ग्लोबल स्कूल ‘फुटबॉल इंडिपेंडेंस कप’चा विजेता : सोरीन सिंग सोनेरी ठरला बुटाचा मानकरी तर अवीर राठी सर्वोत्कृष्ट खेळाडू

ध्रुव ग्लोबल स्कूल ‘फुटबॉल इंडिपेंडेंस कप’चा विजेता
ध्रुव ग्लोबल स्कूल ‘फुटबॉल इंडिपेंडेंस कप’चा विजेता

पुणे- ‘वेद व्हॅली वर्ल्ड स्कूल’तर्फे आयोजित इंटर स्कूल फुटबॉल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ‘फुटबॉल इंडिपेंडेंस कप’२०२४ च्या अंतिम लढतीत ध्रुव ग्लोबल स्कूल ने 1-0  गोल करत  इंदिरा नॅशल स्कूलचा पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही स्पर्धा १३ वर्षाखालील जिल्हास्तरीय खेळाडूंसाठी होती.

शहरातील वेद व्हॅली येथे दोन दिवसीय टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यातील अटीतटीच्या झुंझीत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी दाखविली. विजेता टीमचे खेळाडू सोरीन सिंग यांने विजयी गोल करून, या स्पर्धेत एकमेव गोल करणारा खेळाडू ठरल्याने सोनेरी बूटाचा मानकरीही ठरला. तसेच अवीर राठी यांला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मिळाला. या लढतीमध्ये सोरीन सिंगला अवीर राठीने सुरेख साथ दिली. सोरीन सिंगच्या कामगिरीने ध्रुव ग्लोबल स्कूलने प्रतिस्पर्धी संघावर 1- 0  असा विजय नोंदविला.

अधिक वाचा  Vinesh, you are a champion among champions! : PM Modi's emotional post

१३ वर्षा खालील फुटबॉल खेळाडूंसाठी आयोजित स्पर्धेत जिल्हातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. येथे मुलांचे अप्रतिम खेळाचे प्रदर्शन पहायल मिळाले. या कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन संजय मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रशिक्षक अमेय कलाटे आणि पार्था सेक्या यांनी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले.

ध्रुव ग्लोबल स्कूलचा विजेता संघः  समनय गुप्ता (कॅप्टन), अवीर राठी, अन्वेश खांडे, सोरिन सिंग,नरेन प्रसाद, आयुष गाडवे,  आरव चौधरी, नरेन प्रसाद, आरोन घोषाल व अर्णव महामुने चा सामावेश होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love