पुणे- पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे (वय- 21),असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. रात्री उशिरा उपचारादरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे.
चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात चिंचवडे यांचा बंगला आहे. चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. सर्वजणांनी रात्रीचे भोजन एकत्र केले आणि त्यानंतर प्रसन्न वरच्या मजल्यावर गेला. साडेनऊ च्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येते. तत्काळ त्याला बिर्ला रुग्णालयात दाखल केले, पण तत्पूर्वीच तो मृत झाला होता. या घटनेमुळे चिंचवड परिवार शोकाकुल आहे. रुग्णालयात मोठ्या संख्येने नगरसेवक आणि नागरिकांनी गर्दी केली होती.
मृत प्रसन्न चिंचवडेने रुममध्ये वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर आलेल्या आवाजामुळे ही घटना घरातील व्यक्तींना समजली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रसन्नला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान झाला मृत्यू -त्याच्यावर उपचार सुरू केले. परंतु, रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसन्नने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, परवानाधारक पिस्तुल खेळत असताना गोळी सुटून अपघाती मृत्यू तर झाला नाही ना या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत.