लग्न समारंभासाठी शासनाने जारी केलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नाहीत

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—कोरोनाच्या संसर्गाचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी लग्न समारंभासाठी काही अटी जरी करण्यात आल्या आहेत. परंतु, या अटींबाबत अनेक संभ्रम आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन (Maharashtra Catering Association and Catering Association) पुणे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी केटर्स आणि मंगल कार्यालय व लॉन्सचालकांनी पाळावयाच्या अटींविषयी आक्षेप घेणारे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले (pmc commissioner). त्या वेळी झालेल्या चर्चेत विक्रम कुमार (vikram Kumar) यांनी लग्न समारंभासाठी शासनाने जारी करण्यात आलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. लग्न समारंभाची wedding ceremonyपाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (The conditions for the wedding ceremony do not apply to the city of Pune)

विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहरात लग्न समारंभासाठी पन्नास जणांची मर्यादा आहे. परंतु, त्यामध्ये फक्त वधू आणि वर पक्षाच्या लोकांचाच समावेश असेल. त्यामध्ये भटजी, वाढपी यांचा समावेश नाही. तसेच लग्नासाठी पोलीस परवानगीची गरज नाही. लग्न समारंभाची सीडी पोलीस चौकीला जमा करायची नाही. त्याचप्रमाणे लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या पन्नास जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करायची नाहीत. त्यासंदर्भात मंगल कार्यालय, लॉन्स मालक-चालक आणि केटरर या कोणाकडूनही लेखी हमीपत्र घ्यायचे नाही. लग्न समारंभाची पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही.किशोर सरपोतदार, संजीव वेलणकर, प्रकाश डिंगणकर आणि विनय ताटके या वेळी उपस्थित होते.

शासनाने जारी केलेल्या आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करण्याची हमी केटरिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन पुणे या संस्थेचे पुण्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्सचालक, मालक आणि केटर्स असे अडीचशेहून अधिक सभासद आहेत, असे सरपोतदार यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *