भाजप व शिंदे गटाची जिल्हाधिकाऱयांकडे अजित पवारांविरुद्ध तक्रार 

Complaint of BJP and Shinde groups against Ajit Pawar to District Collector
Complaint of BJP and Shinde groups against Ajit Pawar to District Collector

Complaint Against  Ajit  Pawar  : विकासकामांच्या निधी वाटपात पालकमंत्री (Guardian Minister) अजित पवार(Ajit Pawar ) यांच्याकडून दुजाभाव केला जात असून, स्वपक्षाला झुकते माप दिले जात आहे. आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या (ncp) पदाधिकाऱयांना 800 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही मनमानी असल्याची तक्रार भाजप (bjp) व शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) जिल्हाधिकाऱयांकडे (District Collector) करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील महायुतीतील सुंदोपसुंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. (Complaint of BJP and Shinde groups against Ajit Pawar to District Collector in Pune)

 अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आधी पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)  यांच्याकडे  होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे रोजी झालेल्या बैठकीत 450 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील बहुतांश निधी भाजप (bjp) आणि शिंदे गटातील सदस्यांनी सुचवलेल्या कांमाना मंजूर करण्यात आला होता. मात्र, अजित पवार यांनी बंड केले व ते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्रिपदही अजितदादांना देण्यात आले. पदावर येताच अजितदादांनी चंद्रकांत पाटलांनी मंजूर केलेला निधी रोखून धरला व आपल्या मर्जीतील सदस्यांना तब्बल आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील फक्त दहा टक्के निधी आपल्याला मिळाल्याचा आरोप भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांनी केला आहे.  महाविकास आघाडीच्या काळात निधी वाटपावरून अजित पवार यांच्यासंदर्भात तक्रारी करण्यात येत होत्या. आताही अशाच तक्रारी होताना दिसत असून, अजित पवारांविरोधात भाजपा व शिंदे गटाचे कार्यकर्ते पुण्यात एकवटल्याचे दिसत आहे. यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे भाजप व शिंदे गटाच्या  जिल्हा नियोजन समितीच्या दहा सदस्यांनी तक्रार दिली आहे. या माध्यमातून महायुतीतील अंतर्गत वादच चव्हाटय़ावर आल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा  शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये नको: अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीचा ५ नोव्हेंबरला रास्ता रोको

 चंद्रकांतदादांनी जोडले हात

अजितदादांनी मंजूर केलेला 800 कोटींचा निधी हा तात्काळ रद्द करण्यात यावा.  अन्यथा, आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही भाजपा व शिंदे गटाच्या सदस्यांनी दिला आहे. दुसरीकडे माध्यमांनी याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांतदादांनी हातच जोडले. 

 आम्हाला भाजप, शिंदे गटाबद्दल सहानुभूती : जयंत पाटील

अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री मिळविले व निधीही खेचला. याबद्दल भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी समजून घेण्यासारखी आहे. आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love