Come to Ayodhya on January 22 if you dare

Devendra Fadanvis On Ram mandir :हिंमत असेल तर २२ जानेवारीलाअयोध्येमध्ये या- फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Devendra Fadanvis On Ram mandir | Atal Sanskriti Gaurav Award — “आज काही लोक विचारतात राम मंदिर तुमची खासगी संपत्ती आहे का? हे तेच लोक आहे जे म्हणायचे ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन, तारीख नहीं बताएंगे’. पण, तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली. २२ जानेवारीला हिंमत असेल तर अयोध्येमध्ये(Ayodhya) या. तुम्हालाही रामाचं मंदिर (Ram Temple) काय आहे हे दाखवू. अटलजींचं (Atalji) स्वप्न मोदींनी (Modi) पूर्ण केलं. रामाचं मंदिर (Ram Temple) तयार होत आहे”, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना दिले. (Come to Ayodhya on January 22 if you dare)

संस्कृती प्रतिष्ठान (Sanskruti Pratishthan) आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार(Atal Sanskriti Gaurav Award) प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी फडणवीस(Fadanvis) यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका डॅा. प्रभा अत्रे (Dr. Prabha Atre) आणि प्राज इंडस्ट्रीजचे (Praj Industry) संस्थापक संचालक (Founder Director) डॅा. प्रमोद चौधरी (Dr. Pramod Chaudhari) यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

फडणवीस यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी (अटलबिहारी वाजपेयी) यांच्या आठवणींना उजाळा दिला. “या देशात मोदींनी (Modi)  नवभारताची संकल्पना मांडली, त्यांनी नवभारताची मुहूर्तमेढ केली. या नवभारताची सुरुवात अटलबिहारी वाजपेयींनी केली. त्यांनी पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा संकल्प मांडला. अटलजींना एकदा लोकसभेत विचारलं की अटलजी तुमचा समान किमान कार्यक्रम तर जाहीर झाला. पण यात राम मंदिर (Ram Temple)  आणि कलम ३७० ( Section 370 )नाही. अटलजींना खिजवण्याकरता असं विचारण्यात आलं होतं. त्यावर अटलजी म्हणाले की, आम्ही राम मंदिरही विसरू शकत नाही आणि ३७० ही विसरू शकत नाही. समान नागरी कायदाही विसरू शकत नाही. आज आम्ही २२ पक्षांचं सरकार घेऊन चालत आहोत. हा समान किमान कार्यक्रम २२ पक्षांचा आहे. परंतु, मी दाव्यानिशी सांगू शकतो की, ज्यादिवशी या देशात माझ्या पक्षाचं सरकार येईल, तेव्हा राम मंदिरही बनेल आणि ३७० ही रद्द होईल”, अशी आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.

“ज्या क्षणी मोदींच्या नेतृत्त्वात सरकार तयार झालं पूर्ण बहुमत मिळालं, तेव्हा कलम ३७० ही गेलं आणि २२ तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे”, असंही  फडणवीस म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *