पुण्यात ‘छात्रों की गूंज’चा नाद; राहुल गांधींच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण!

छात्रों की गूंज राहुल गांधी पुणे
छात्रों की गूंज राहुल गांधी पुणे

पुणे(प्रतिनिधी)–लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या बुधवारी गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे राहुलजी गांधी यांच्या भव्य प्रतिकृतीचे (कटआउट) उत्साहात अनावरण करण्यात आले.

ढोल-ताशांचा गजर, ‘छात्रों की गूंज’चे गीत आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या हस्ते या भव्य प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, केंद्रीय निरीक्षक मनोज त्यागी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षा दीप्तीताई चौधरी यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

अधिक वाचा  तर आज कोरोना लसीची कमतरता जाणवली नसती - अजित पवार

“सावित्रीच्या लेकींचा आवाज आता देश ऐकेल!” असा नारा देत पुण्यातील विद्यार्थिनींना २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love