1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उपस्थित राहणार


पुणे : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उर्फ रावण हे उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिमा कोरेगाव अभिवादन महारॅली आयोजित करण्यात येणार आहे.

या रॅलीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे भीम आर्मी पुणे शहर अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी कळविले आहे.


1 जानेवारी रोजी अभिवादनासाठी येणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या दौऱ्याचे निमित्त साधत पुणे परिसरांमध्ये भीम आर्मी च्या संघटनात्मक बांधणी च्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा, कार्यकारिणीची बैठक, व हितचिंतक समर्थक यांच्यासमवेत विविध बैठकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगानेची पूर्वतयारी पूर्ण झाली असून या नियोजित कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहा निर्माण झालेला आहे व याचा आगामी काळात संघटना बांधणीसाठी मोठा फायदा होणार असल्याचेही अभिजीत गायकवाड यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेतर्फे कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न