पिंपरी(प्रतिनिधी)–भक्तिगीते, भावगीते, लावणी, गोंधळ, देशभक्तीपर मराठी हिंदी गाणी, निखळ विनोद, टाळ्या, शिट्ट्या यामुळे पिंपळे गुरवमधील रसिक अक्षरशः हास्यकल्लोळात न्हाऊन निघाले. निमित्त होते नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे आयोजित दिवाळी पहाटचे.
दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय गायक हिम्मत कुमार पंड्या, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका शीर्षक गीत गायक संदीप उबाळे, प्रसिद्ध गायिका चारुलता, गायिका मंजुश्री देशपांडे यांचे सुमधुर गायन झाले. त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजात गाणी गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. गणपती गीत, कोणता झेंडा घेऊ हाती, झुमका गिरा रे, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठल विठ्ठल अशा अनेक गाण्यांनी वन्समोर मिळविले. रसिकांना अक्षरशः ठेका धरायला भाग पाडले.
दरम्यान, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गायिका पल्लवी पत्की-ढोले व इंडियन आयडॉल फेम गायक मुनावर अली व संजय हिवराळे यांनी आपल्या विविधरंगी ढंगात गायलेल्या गाण्यांनी पिंपळे गुरवकरांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी संतोष महाराज पायगुडे, वसंतराव जगदाळे, शेखर महाराज जांभुळकर, चंद्रकांत महाराज वांजळे, बोरकर महाराज शास्त्री, अखिल महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आर. के. रांजणे, शिवानंद स्वामी महाराज, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, आयोजक विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, तानाजी काळभोर, अभिषेक जगताप, संदीप राठोड, कविता जगताप, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, कस्तुरी कोलते, बालाजी पवार, संपत मेटे, सुनील कदम, शिवाजी पाडुळे, प्रमोद महाराज पवार, सुनील घाडगे, नारायण सूर्यवंशी, जयराम देवकर, सुरेश धाडीवाल, साहेबराव तुपे, प्रदीप गायकवाड, अर्जुन शिंदे, उदय ववले, प्रा. महादेव रोकडे, विश्वनाथ शिंदे, विजय उलपे आदी उपस्थित होते.