इंदिरा आयव्हीएफ तर्फे मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियानास सुरुवात


पुणे – भारतातील सर्वात मोठे वंध्यत्व क्लिनिक इंदिरा आयव्हीएफ तर्फे सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत मुलींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संस्थेच्या १ लाख यशस्वी आयव्हीएफ बाबत आयोजित वॉकथॉन आणि परिषदेच्या कार्यक्रमात दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.  

विमान नगर येथील सिम्बायोसिस क्रीडांगणापासून सकाळी आयोजित केलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या वॉकथॉनमध्ये स्थानिक लोकांपासून ते नियमित धावपटूंचा मोठा सहभाग होता. आशियाई युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप विजेती अवंतिका नरळे, यांसारखे मान्यवरही देशाच्या विकासात असलेले मुलींचे महत्व ठसविण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. इंदिरा आयव्हीएफ चे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. अजय मुर्डिया, इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक डॉ. क्षितिज मुर्डिया आणि इंदिरा आयव्हीएफचे संचालक आणि सह-संस्थापक नितीझ मुर्डिया हे देखील यावेळी उपस्थित होते. अक्षदा जाधव, शीतल जावक, श्वेता सिंग, अन्वी सिंग आणि त्यांची कन्या या आघाडीवर असलेल्या महिला वॉकर्स तसेच सुनील रिठे, साजन कुमार आणि अर्णव रावत या वॉकर्सचा या कार्यक्रमात त्यांच्या उत्साह आणि खिलाडूवृत्तीसाठी सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा  कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे औषध सापडले? पुण्यातील डॉक्टरांचा दावा

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, अधिवक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या रमा सरोदे, बॉलीवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जैन साध्वी, तत्वज्ञानी आणि प्रेरक विचारवंत वैभवश्रीजी आणि सेंट मेरी स्कूल, पुणेच्या मुख्याध्यापक सुजाता मल्लिक कुमार यांच्या उपस्थितीत सेव्ह द गर्ल चाईल्ड परिसंवादाने दिवसाची सांगता झाली. या परिषदेमध्ये महिला सक्षमीकरण या विषयावर प्रकाश टाकण्यात आला; या परिसंवादात डॉ. अजय मुर्डिया, सोनाली कुलकर्णी, सुजाता मल्लिक कुमार, अॅड रमा सरोदे, डीसीपी नम्रता पाटील आणि श्रीमती वैभवश्री जैन सहभागी झाले होते.

बदलत्या जीवशैलीनुसार, उशिरा होणाऱ्या लग्नांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .यासाठी योग्य उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. याच उपाययोजनांमध्ये अंडाशय दान तसेच २२ ते ३० गटातील स्त्रियांनी त्यांचे अंडाशय राखून ठेवले पाहिजे याबद्दल जनजागृती करण्यात आली.

अधिक वाचा  राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार- संभाजीराजे छत्रपती : 'स्वराज्य' संघटनेची केली घोषणा

 दोन्ही कार्यक्रमांमध्ये १००० लोकांचा सहभाग दिसला. त्या सर्वानीच हा उदात्त संदेश पसरवण्याची जबाबदारी पार पाडली. दिवसभरात सहभागी झालेल्या इतर उल्लेखनीय नावांमध्ये अॅड शोभा पगारे, डीसीपी रोहिदास पवार, अनुश्री बाथला, दलजीत रायजादा, डॉ आशिष भारती, डॉ कल्पना बळीवंत, प्रीती क्षीरसागर, कुलदीप भारद्वाज, स्वामीनाथ शहा, मनोज दिलीप इंगळे, योगेश मुळीक, राहुल भंडारे आणि संगीता गलांडे यांचा समावेश होता. पुणे जिल्हा ऍथलेटिक असोसिएशन, पुणे वुमनिया, विमान नगर महिला क्लब, सृष्टी प्रतिष्ठान आणि पुणे पेठ रनर यांच्या सहयोगाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

इंदिरा आयव्हीएफचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. अजय मुर्डिया म्हणाले की २०११ मध्ये नव्याच्या जन्मापासून आमच्या पहिल्या यशोगाथेला सुरुवात झाली. ज्या जोडप्यांना त्यांचे कुटुंब वाढवण्यात अडचण येत आहे त्यांना मदत करण्याच्या आमच्या उद्दिष्टात आम्ही किती पुढे गेलो आहोत; एका आयुष्यापासून ते एक दशकानंतर एक लाखापर्यंत जाण्याचा प्रवास बघताना मला खूप आनंद होत आहे. लोकांना वंध्यत्वाच्या बंधनातून मुक्त करण्याचा आणि त्यांच्या उपचारांसाठी वैद्यकीय उपाय, सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार आहे.”

अधिक वाचा  सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज भरणार : दोन्ही बाजूने शक्ति प्रदर्शन होणार

इंदिरा आयव्हीएफ पुणे येथील डॉ. अमोल लुंकड म्हणाले की आज झालेल्या वॉकथॉन आणि सेव्ह द गर्ल चाइल्ड परिसंवादाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आम्ही आनंदी झालो आहोत. आमच्या संस्थेचा ज्या तत्वावर अढळ विश्वास आहे त्या तत्वाला जोडण्याचा, त्या कारणासाठी उभे राहण्याचा आमचा हा नम्र प्रयत्न होता. आम्ही पुढे वाटचाल करत असताना केवळ सहभागी नाही तर समान भागीदार असलेल्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो. लोकांचा असाच पाठिंबा आणि विश्वासामुळे इंदिरा आयव्हीएफ मध्ये १  लाख यशस्वी आयव्हीएफ प्रक्रिया पार पडल्या. हा विश्वास असाच कायम राहिल अशी आम्ही आशा करतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love