पुणे : भारतातील ऊसाच्या शेतकऱ्यांना आता बीएएसएफने आजच शुभारंभ केलेल्या वेसनीट® कम्प्लीट ह्या नावीन्यपूर्ण तणनाशकाद्वारे गवत व रूंद पानांच्या तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. हे नवे साधन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे जास्त चांगले उत्पन्न देण्याची खात्री देताना एका नवीन पातळीवरील प्रादुर्भावोत्तर (प्रादुर्भाव झाल्यानंतरच्या) साधनाने शक्तिशाली बनवते, असा दावा कंपनीने केला आहे.
भारत हा ऊसाचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. तथापि, एकिनोक्लोआ एसपीपी, डिजिटारीया सॅन्गूनालिस, डॅक्टीलोक्टेनियम इजिप्टियम, क्लोरीस बर्बाटा, एल्यूसाइन इंडिका, ॲमॅरान्थस व्हिरिडिस, पार्थेनियम हिस्टेरोफोरस सारख्या विविध गवत व रूंद पात्याच्या तणांचा प्रादुर्भाव हे भारतातील ऊसाच्या शेतकऱ्यांसमोरील महत्वाचे आव्हान आहे.
वेसनीट® कम्प्लीट हे टोप्रामेझोन आणि अट्राझिन ह्या दोन वेगवेगळ्या पध्दतींचे कार्य आणि गवत व रूंद पानांची तणे यांच्यावर दीर्घकाळपर्यंत प्रभावी नियंत्रण देणाऱ्या अनोखे इनबिल्ट पूरक द्रव्यांचे अनोखे मिश्रण आहे. वेसनीट® कम्प्लीट वापर करण्याच्या सुलभते बरोबर ऊसाच्या पिकाला उत्कृष्ट संरक्षण देखील देते. ऊसाबरोबर वेसनीट® कम्प्लीट हे मक्याच्या शेतातील गवत व रूंद पानांची तणे यांच्यावर प्रभावी नियंत्रण देण्यासाठी देखील तेवढेच प्रभावी आहे.
शेती हे पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्य आहे. बीएएसएफ मध्ये आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यास व त्यांच्या बरोबर काम करण्यास समर्पित आहेत. आमच्या नवीन उपक्रमांबरोबरच आमची ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स टीम शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी व्यावसायिक व तांत्रिक मदत करते.” नारायण कृष्णमोहन, मॅनेजिंग डायरेक्टर, बीएएसएफ इंडिया लिमिटेड म्हणाले.
बीएएसएफची ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स टीम शेतकऱ्यांच्या सध्याच्या तसेच जलद गतीने निर्माण होणाऱ्या नवीन गरजा समजून घेण्यासाठी आणि बाजारपेठेत नावीन्यपूर्ण साधने आणण्यासाठी आपले ग्राहक आणि सहयोगी यांच्याबरोबर सातत्याने संवाद साधते.