gtag('js', new Date());
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
शोधा
Sunday, June 15, 2025
  • जाहिरातीसाठी संपर्क
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
मुख्य पृष्ठ पुणे-मुंबई कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
  • पुणे-मुंबई
  • महत्वाच्या बातम्या

कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी
News24Pune
-
June 4, 2025
शेअर
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Linkedin
Telegram
    कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती
    कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती
    Spread the love

    Post Views: 26

    पुणे(प्रतिनिधि)-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Dowry Death Case) मराठा समाजाने या उधळपट्टीवर लगाम घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने लग्नसमारंभासाठी एक  आचारसंहिताच जाहीर केली असून, यामुळे समाजातील अनाठायी खर्च आणि हुंडापद्धतीला आळा बसणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पातळीवर लवकरच एक कमिटी नेमली जाणार असून, त्या माध्यमातून जनजागृती केली जाईल.बुधवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

    अनाठायी खर्चावर लगाम: ‘प्री-वेडिंग’ ते ‘डेस्टिनेशन वेडिंग’ला फाटा

    मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून लग्नसमारंभात प्रचंड उधळपट्टी केली जाते. श्रीमंती दाखवण्यासाठी काहीजण प्री-वेडिंग शूट (Pre-wedding shoot), डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding), रिसॉर्ट वेडिंग (Resort Wedding), थीम वेडिंग (Theme Wedding), संगीत (Sangeet) अशा संस्कृतीबाह्य गोष्टी करतात. ज्यांना हे परवडते, त्यांचे ठीक आहे; पण अनेकजण ऐपत नसतानाही समाजाला दाखवण्यासाठी हा सगळा भपकेबाजपणा करतात.  याच वाढत्या भपकेबाज लग्नांमुळे आणि हुंडापद्धतीमुळे अनेक निष्पाप विवाहितांचे बळी जात असल्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता मराठा समाजातील धुरिणांनी हुंडापद्धतीला लगाम घालण्याचा आणि विवाह सोहळ्यात साधेपणा आणण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी समाजातील नामवंत व्यक्ती, पोलिस अधिकारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्या विभाग स्तरावर दबाव समित्या तयार करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हुंड्यासाठी सासरी होणारा छळ आणि आत्महत्याच्या घटना रोखण्यासाठी विवाह सोहळ्यासंदर्भात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

    अधिक वाचा  दहावीची गुणपत्रिका आता एका क्लिकवर: 'DigiLocker' मुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

    या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन प्राची दुधाने, विकास पासलकर, विराज तावरे, प्रशांत धुमाळ यांसह कार्यकर्त्यांनी केले होते. या बैठकीला इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate), श्रीकांत शिरोळे (Shrikant Shirole), प्रशांत जगताप (Prashant Jagtap), अरविंद शिंदे (Arvind Shinde), अंकुश काकडे (Ankush Kakade), राहुल पोकळे (Rahul Pokale), अ‍ॅड. पूजा झोळे (Adv. Pooja Zole), अजय भोसले (Ajay Bhosale), प्रशांत कुंजीर (Prashant Kunjir) यांसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नव्या आचारसंहितेतील महत्त्वाचे नियम

    मराठा समाजाने जाहीर केलेल्या नव्या आचारसंहितेत अनेक महत्त्वाचे नियम समाविष्ट आहेत, जे समाजाला योग्य दिशा देतील:

    हुंडाबंदी: हुंडा देणार नाही व घेणार नाही.

    सामाजिक बहिष्करण: ज्या कुटुंबात महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटी-बेटी व्यवहार करणार नाही आणि ती कुटुंबे मराठा समाजातून बहिष्कृत केली जातील.

    अधिक वाचा  जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत : शरद पवार यांचा तूर्तास थांबण्याचा सल्ला

    माहेरचा आधार: ज्या महिलेचा सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, तिचे माहेरचे लोक ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहतील.

    साधे विवाह: कोणत्याही प्रकारचे अनावश्यक प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने व वेळेवर केले जातील.

    कौटुंबिक मानपान: मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणार नाही. जावई मान, इत्यादी सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील.

    सामूहिक विवाह: मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल.

    एकच वक्ता: विवाह सोहळ्यात केवळ एकच व्यक्ती आशीर्वादाचे स्वरूपातील भाषण देईल.

    कमी पाहुणे: विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल.

    खर्चाला फाटा, शिक्षणाला प्राधान्य: विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून, मुलगा-मुलगी यांच्या नावे एफडी (FD) केली जाईल, तसेच काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात केली जाईल. मुला-मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल.

    डीजेबंदी व प्रदूषणमुक्त: वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज व त्यावरील बीभत्स नृत्य बंद केले जाईल. तसेच, प्रदूषणयुक्त फटाके वाजवले जाणार नाहीत.

    प्री-वेडिंग शूट टाळा: प्री-वेडिंग शूट टाळले जातील.

    अधिक वाचा  जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात

    खर्चाची विभागणी: विवाह सोहळ्याचा खर्च वर व वधू पक्षाने अर्धा-अर्धा करावा.

    अनुचित प्रकार रोखण्यासाठी समितीची मध्यस्थी

    समाजातील काही जबाबदार व कर्तव्यदक्ष व्यक्तींची समिती किंवा मंडळ स्थापन केले जाईल. यामध्ये सहभागी कोणतीही व्यक्ती मराठा समाजाचा वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय, व्यावसायिक, सामाजिक, इत्यादी गैरफायदा घेणाऱ्या मानसिकतेची नसावी, याची पूर्ण खात्री केली जाईल. गावागावात अशी समिती नेमून काही अनुचित प्रकार होत असल्यास मध्यस्थी करून ते रोखले जातील.

    या निर्णयामुळे मराठा समाजात एक सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे. पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदलण्यास काही कालावधी जाईल; यासाठी आवश्यक जनजागृतीसाठी सातत्याने मराठा समाज प्रयत्न करेल. आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा समाजाने गौरव करावा आणि समाजातील आदर्श विवाह सोहळ्यांचे अनुकरण करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. येणाऱ्या काळात मराठा समाज इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नियमावली व आचारसंहिता यावर चर्चा करून, संपूर्ण समाजासाठी त्याची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्न करेल, असे आवाहनही करण्यात आले.

    Like
    50% LikesVS
    50% Dislikes

    Spread the love
    • टॅग
    • आचारसंहिता (Code of Conduct)
    • खर्च नियंत्रण (Expense Control).
    • जनजागृती (Awareness Campaign)
    • डीजेबंदी (DJ Ban)
    • पुणे (Pune)
    • प्री-वेडिंग शूट (Pre-wedding Shoot)
    • मराठा समाज (Maratha Community)
    • लग्न सोहळा (Wedding Ceremony)
    • वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane)
    • समिती (Committee)
    • साधे विवाह (Simple Weddings)
    • सामाजिक बदल (Social Change)
    • हुंडाबंदी (Dowry Ban)
    • हुंडाबळी (Dowry Death)
    मागील बातमी पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयासाठी “दोन्ही पवार एकत्र यावेत” : बॅनरबाजी
    पुढील बातम्या शिवराज्याभिषेकदिनी शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे होणार भूमीपूजन
    News24Pune
    https://news24pune.com

    संबंधित बातम्या अधिक बातम्या

    मावळमध्ये कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
    पुणे-मुंबई

    मावळमध्ये कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला: 2 जणांचा बळी, 25-30 पर्यटक वाहून गेल्याची भीती

    अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू
    पुणे-मुंबई

    “आई, मी फ्लाइटवर जातोय…” इरफानचा निरोप ठरला अखेरचा! : अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू

    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ
    महत्वाच्या बातम्या

    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, पण.. : संजय शिरसाठ म्हणाले..

    Follow Us

     

    मावळमध्ये कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

    मावळमध्ये कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला: 2 जणांचा बळी,...

    June 15, 2025
    अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू

    “आई, मी फ्लाइटवर जातोय…” इरफानचा निरोप ठरला अखेरचा! : अहमदाबाद विमान...

    June 13, 2025
    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ

    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, पण.....

    June 13, 2025
    One passenger survived the Ahmedabad plane crash

    Air India Flight Crashesh : अहमदाबाद विमान दुर्घटनेतून एक प्रवासी सुखरूप...

    June 12, 2025
    Sunil Tatkare's family also suffered a big blow in the Ahmedabad plane crash

    Air India flight crashes :अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्राच्या 6 जणांचा दुर्दैवी...

    June 12, 2025
    राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.
    महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
    संपर्क करा: [email protected]

    POPULAR POSTS

    On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

    पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

    July 6, 2024
    Encroachment action by railway administration in Bhushi Dam area

    भुशी धरण परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई : शेकडो कुटुंब रस्त्यावर 

    July 2, 2024
    798 mm of rain in Lonavala in 3 days

    3 दिवसांत लोणावळ्यात तब्बल 798 मिमी पाऊस : पूरस्थितीमुळे पर्यटकांना पर्यटनाकरिता...

    July 25, 2024

    POPULAR CATEGORY

    • पुणे-मुंबई1847
    • राजकारण1242
    • महाराष्ट्र704
    • महत्वाच्या बातम्या529
    • क्राईम374
    • शिक्षण196
    • लेख164
    • आरोग्य133
    • देश-विदेश117
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    © Copy Right@News24Pune
    पुणे-मुंबई

    कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

    by News24Pune time to read: <1 min
    पुणे-मुंबई शिवराज्याभिषेकदि�…
    महत्वाच्या बातम्या पुणे महापालिका निव…
    • 0
    • 0
    • 0
    0
    अधिक गोष्टी
    Drug party case on FC Road

    #एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण : आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस...

    June 24, 2024
    धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती

    धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत :...

    September 9, 2024

    WhatsApp us