युवासेनेच्या पदाधिकाऱ्याच्या खून करणाऱ्या बापू नायर टोळीच्या सदस्यास अटक


पुणे–गेल्या २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निघृण खून झालेल्या पुण्यातील युवा सेनेचे पदधिकारी दीपक मारटकर यांच्या फरारी असलेल्या मुख्य आरोपी व सूत्रधारास  पोलिसांनी कराड येथील पेठ नका येथून अटक केली आहे. स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे असे त्याचे नाव असून तो बापू नायर टोळीचा सदस्य आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ही कारवाई केली. 

दीपक मारटकर यांचा २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता बुधवार पेठेतील गवळी आळी येथे डोक्यावर, हातावर व तोंडावर वार करुन खून करण्यात आला होता. अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ यांनी राजकीय वैमनस्यातून हा खून घडवून आणल्याचा आरोप आहे. या आरोपी हे बापूर ऊर्फ प्रभाकर नायर व स्वप्नील ऊर्फ सतीश चॉकलेट मोडवे याच्या टोळीचे सदस्य असून ते टोळीसाठीच त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. मोडवे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. दरम्यान तो सध्या सांगली, कराड भागात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा  युनिट १ चे पथक रवाना झाले होते. मोडवे हा पांढऱ्या गाडीतून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पेठ नका चौकात गाडी अडवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अधिक वाचा  दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

दरम्यान, या प्रकरणी १० जणांवर मोक्का अनातर्गत कारवाई करण्यात आली आहे. अश्विनी सोपान कांबळे, महेंद्र मदनलाल सराफ, निरंजन सागर म्हंकाळे, प्रशांत ऊर्फ सनी प्रकाश कोलते, राहुल श्रीनिवास रागीर, रोहित ऊर्फ बाळा कमलाकर कांबळे, रोहित दत्तात्रय क्षीरसागर, संदीप ऊर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते, लखन मनोहर ढावरे आणि चंद्रशेखर रामदास वाघेल अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love