दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार.

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन नंतर  आता पुण्यामध्ये अनेक गोष्टींच्या नियमावलीत शिथिलता प्रशासन आणि पुणे महापालिकेकडून आणली जात आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकानदारांना जे सम- विषम तारखेचे बंधन होते. ते काढून टाकण्यात आले आहे. मुंबईनंतर पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार आहे. दुकानदारांची अनेक दिवसांची ही मागणी मान्य झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुण्यातली दुकानं एक दिवसाआड सम आणि विषम तारखांप्रमाणे उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता लवकरच हे बंधनही उठवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त यासंबंधी आदेश लवकरच काढतील. नव्या नियमाप्रमाणे शहरातली सर्व दुकानं सकाळी ९ ते ७ या वेळेत सुरू राहणार आहे.

व्यापाऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य करून आयुक्त विक्रमकुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पुण्यात्तील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले  नाही. परंतु, लॉकडाऊनचे नियम मात्र शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत नुकतीच दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली. आता मुंबईनंतर पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार आहे.

पाणीकपात न करण्याचाही घेतला निर्णय

व्यापाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर पुणेकरांसाठी महापालिकेने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता होती. पण तूर्तास किमान गणेशोत्सवापर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *