जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा : फारूक अब्दुल्ला आणि इतरांकडून १२ कोटींची संपत्ती जप्त


नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)–जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) मनी लॉन्ड्रिंग Money laundering प्रकरणात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला National Conference President Farooq Abdullah आणि इतरांकडून इंफोर्समेंट डायरेक्टरेटने Enforcement Directorate (ईडी) 11.86 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. शनिवारी ईडी अधिका्यांनी याबाबत माहिती दिली.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणात जेकेसीएच्या पदाधिकार्यांना आरोपी करण्यात आले आहे.  ज्यात सरचिटणीस मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष अहसन अहमद मिर्झा यांचा समावेश आहे.

 सन 2018  मध्ये सीबीआयने अब्दुल्ला, खान, मिर्झा यांच्याशिवाय जेकेसीएचे माजी कोषाध्यक्ष मीर मंजूर  गजनफ्फर अली, माजी लेखापाल बशीर अहमद मिसगर आणि गुलजार अहमद बेग यांच्याविरूद्ध जेकेसीए फंडातील सुमारे 43.69  कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासाठी आरोपपत्र दाखल केले होते. 2002 ते 2011 च्या दरम्यान राज्यातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ही रक्कम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वाटप केली होती. या प्रकरणात ईडीने फारूक अब्दुल्ला यांची अनेकदा  चौकशी केली होती .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  तर.. नरेंद्र मोदी काय चीज आहे?- शरद पवार