संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी प्रस्थान : कसा असणार पालखी सोहळा?

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारी सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पार पडणार आहे. उद्या ( गुरुवार दि. 1 जुलै ) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर शुक्रवारी(दि. 2 जुलै) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून सुरुवात होते. प्रस्थान सोहळ्याच्या 3 दिवस आधीचं देहूनगरीत आणि आळंदीत लाखो वारकरी जमायला सुरुवात होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा यंदाचा 336 वा पालखी प्रस्थान सोहळा उद्या (1 जुलै) पार पडतोय, तर 2 जूलैला आळंदीतून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होतंय, मात्र यंदा कोरोनामुळं राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आणि बसनंच पालखी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला.

एसटी महामंडळाच्या 8 शिवशाही बसेसमधून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार

एसटी महामंडळानं 8 शिवशाही बसेसंही उपलब्ध केल्यात. प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील मंदिराला 5 हजार किलो फुलांची  सजावट केली जाणार आहे. देहूतील मंदिरही आकर्षक अशा फुलांनी सजवलं जाईल. प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती, देहू संस्थानचे पालखी प्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे.

मानाचे 100 वारकरी मंदिरात सोडणार

संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पालखीचं प्रस्थान उद्या दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. दुपारी 2 वाजता मानाचे 100 वारकरी मंदिरात सोडले जातील. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. पहाटे 4 ते 5 सर्व देवांची महापूजा करण्यात येईल. सकाळी 9 ते 12 सप्ताहाच्या काल्याचे किर्तन देवकर महाराज करतील. दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम असेल

1 ते 19 जुलै दरम्यान नित्याचे कार्यक्रम

पहाटे 4 ते 6 सर्व देवांची नित्य पूज

सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत पालखी सोहळा वाटचालीचे कार्यक्रम

सायंकाळी 6 वाजता समाज आरती

सायंकाळी 9 ते 11 कीर्तन सेवा

सायंकाळी 11 नंतर शेज आरती

19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने जातील. त्यानंतर 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहतील.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडून  केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत.

प्रस्थान कार्यक्रम 2 ते 24 जुलै वारी सोहळा

पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती

सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन

दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य

सायंकाळी 4 : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ

सायंकाळी 6 : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी

प्रस्थानानंतर 3 ते 19 जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार

19 जुलै : माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

19 ते 24 जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी

24 जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *