पुणे– दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर करचोरी प्रकरणी त्यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत.त्यामुळे त्यांची आयकर खात्याकडून चौकशी केली जात आहे.
३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग, तापसीसह मधू मंटेना आणि विकास बहल यांच्याविरोधात छापेमारीची मोहीम हाती घेतली होती. फँटम फिल्म प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या या सेलिब्रिटींची चौकशी सुरूच असून, अनुराग, तापसीची पुण्यात चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अनुराग कश्यप हा पुण्यातील भारतीय कामगार सेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांना भेटला होता. अनुराग कश्यप सोबत झालेल्या भेटीचे फोटो रघुनाथ कुचिक यांनी सोशल मीडियावर टाकले होते. यावेळी लॉकडाऊन काळात बॉलिवूडवर झालेले परिणाम आणि बदल यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कुचिक यांनी सांगितले होते. दरम्यान, पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची चौकशी सुरू होती.
दरम्यान, अनुराग आणि तापसी पुण्यातील वेस्टीन हॉटेलमधून पिंपरी चिंचवडमधील सयाजी हॉटेलमध्ये शिफ्ट झाले. तिथंही आयकर विभागाकडून चौकशी केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. अनुराग, तापसीसह आयकर विभागाचे अधिकारी हॉटेल सयाजीमध्ये येऊन थांबलेले आहेत. ते इथं कधीपासून आहेत आणि कधीपर्यंत असतील, याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडून गुप्तता पाळली जात आहे.त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी सुरु असल्याचे समजते. कालपासून चौकशी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून समजली आहे. आणखी दोन-एक दिवस ही चौकशी सुरु राहिल, अशी माहिती पुढे येत आहे.