कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांचा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा

Anniversary of Konkani Maratha Samaj Pune and Pimpri Chinchwad celebrated with enthusiasm
Anniversary of Konkani Maratha Samaj Pune and Pimpri Chinchwad celebrated with enthusiasm

पुणे-कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांचा वर्धापन दिन कार्यक्रम आज गरवारे कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये उत्साहाने पार पडला. यानिमित्ताने दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय पाष्टे, संचालक, डायमंड बूक सेंटर, पुणे आणि ह.भ.प. श्री. वसंतराव मोरे – संस्थापक अध्यक्ष, कोकणवासीय मराठा समाज पुणे सेंटर पुणे हे उपस्थित होते.  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कृष्णा मोरे उपस्थित होते.

समाजभूषण सामाजिक पुरस्कार – (ग्रामीण) हा  माननीय श्री. बाबाजीराव गोपालराव जाधव यांना प्रदान करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कृष्णा मोरे, माननीय श्री. दत्तात्रय पाष्टे, माननीय श्री. वसंत मोरे, उपाध्यक्ष श्री. अनिल आप्पाजी मोरे व इतर पदाधिकारी

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'हिरो'- राज्यपाल कोश्यारी

आजच्या या कार्यक्रमात समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, उद्योजक, शिक्षण, क्रिडा आणि पोलिसदल क्षेत्रातील मान्यवरांचा आज पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच समाजातील सीए, डॉक्टर, एम.पी.एस.सी, उत्तीर्ण झालेल्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या समाजातील अनेक नामवंतांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. रमेश मारुती मोरे, श्री. कृष्णा रामजी कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, संपर्कप्रमुख व सर्व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love