आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवरून स्थानिक रहिवासी आणि पोलिस प्रशासन आमने-सामने: कारवाईला न्यायालयाची स्थगिती


पुणे–पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवरून स्थानिक रहिवासी आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओड्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप यावेळी येथील स्थानिकांनी केला. काहीकाळ याठिकाणी तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. दरम्यान, अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकेनं स्थगिती दिली आहे.  महापालिकेच्या न्यायालयानं हा आदेश दिला आहे.

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील तोडक कारवाईला अखेर नायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. आंबिल ओढालगत असलेली घरं पाडण्याची कारवाई सकाळपासून सुरु होती. या कारवाईला स्थानिकांकडून मोठा विरोध सुरु होता. मात्र, पोलीस बळाचा वापर करत ओढा परिसरातील अनेक घरं पाडण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये मोठा वाद झाल्याचंही पाहायला मिळालं. काही स्थानिकांना अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला. अशास्थितीत वकिलांनी स्थानिकांची बाजू कोर्टात मांडल्यानंतर कोर्टाकडून या तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अधिक वाचा  ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

नागरिकांच्या विकलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय म्हणाले, या लोकांना विस्थापित होणार आहे, त्यांचं पुनर्वसन करण्याचं कोणतंही रेकॉर्ड न्यायालयासमोर नाही, त्यामुळे लोकांना उद्ध्वस्त करणं उचित ठरणार नाही, त्यामुळे या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love