कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त अभाविपची पुण्यात निदर्शने

राजकारण
Spread the love

भाजप आमदार सुनील कांबळे यांचे ठिय्या आंदोलन

पुणे– धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाण प्रकरणाच्या निषेधार्त आज पुण्यातील गुडलक चौकात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, भाजपचे आमदार सुनील कांबळे डेक्कन पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांवर अश्या पद्धतीचा हल्ला अभाविप कधीच सहन करणार नाही. या घटनेस जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आज विद्यार्थी विरोधात आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणारी घटना घडली आहे. धुळे येथे सामान्य विद्यार्थ्यांवर धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांवर अश्या पद्धतीचा हल्ला अभाविप कधीच सहन करणार नाही. या घटनेस जे कोणी जवाबदार आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी.

विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे व त्यावर न्याय मागणे हा कोणता गुन्हा आहे ? परीक्षा शुल्क परत मागितले तर विद्यार्थ्यांचे काय चुकले ? विद्यार्थ्यांवर केलेली हि कार्यवाही कितपत योग्य आहे ? असे अनेक प्रश्न यावेळी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. हे आंदोलन करत असताना पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आहे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांन वरती गुन्हे दाखल करण्याचे काम पुणे पोलीस करत आहेत. या निषेधार्थ,  आमदार सुनील कांबळे  डेक्कन पोलीस स्टेशन ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करावी तसेच या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सहानुभूतीने दखल घ्यावी, अशी मागणी मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या सर्व घटनेचा अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *