पुणे : संचारबंदीमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे.अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या विचाराने स्वारगेट परिसरातील गरजू कुटुंब, स्वारगेट पोलीस स्टेशन येथील सफाई कर्मचारी, आदींना आठ-दहा दिवस पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला, सर्जेराव बाबर स. पो. आयुक्त, आनंद पिंपळकर वास्तूतज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानश्री फाउंडेशन केले होते. या वेळी अमर काळे, सोनम पाटील, राजेंद्र दीक्षित, यशवंत भुजबळ, अजय करंदीकर ज्ञानश्री फाउंडेशनचे हे सर्व विश्वस्त तसेच नागाअण्णा झळकी, अभिनेते प्रणव पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी ज्ञानश्री फाउंडेशनचे चुनावाला म्हणाले की ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे अंमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवसांपासून शहरात संचारबंदी असल्याने मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना घरीच बसून रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाबर म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात सर्व दैनंदिन व्यवहार बंद असल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही. अशा लोकांना दोन वेळेच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने ज्ञानश्री फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम पाटील यांनी केले तर आभार अमर काळे यांनी आभार मानले.