कौशिकी चक्रबर्ती आणि राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने रंगला ‘वसंतोत्सव’चा पहिला दिवस


पुणे : पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांच्या दमदार सहगायनाने ‘वसंतोत्सव’चा आजचा पहिला दिवस रंगला.

यावर्षी पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणारा १६ वा ‘वसंतोत्सव’ म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी संपन्न होत आहे.

कौशिकी व राहुल यांच्या सहगायनाने आजच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी या दोघांनी ‘धुंद लाओ नी माननीय…’ ही राग बागेश्री मधील तीन तालातील पारंपरिक बंदिशी सादर केली. कौशिकी व राहुल या दोघांनी आपापल्या गायन पद्धतीने याचे दमदार सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत त्यांची वाह वाह मिळविली.

अधिक वाचा  सहकारी बँकांच्या संचालकपदी दोनपेक्षा जास्त मुदतीसाठी राहता येणार नाही - सतीश मराठे

यांनतर त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेले प्रसिद्ध ‘ना मोनो लागे ना…’ हे गीत प्रस्तुत केले. यानंतर त्यांनी ‘मृगनयना रसिक मोहिनी…’ हे राग दरबारी कानडा मधील नाट्यगीत व ‘मोगरा फुलला..’ हे गोरख कल्याण मधील गीत त्यांनी सादर केले. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल…’ या अभांगाने या दोघांनी आपल्या सादरीकरणाचा व महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला

त्यांना ईशान घोष (तबाला), आदित्य ओक (संवादिनी), संजॉय (गिटार), मुराद अली खान (सारंगी), अनय गाडगीळ (सिंथेसायजर), अविनाश कुलकर्णी (पर्कशन्स) यांनी साथसंगत केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love