सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण


मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला बॉलीवूड वादानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवावे अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे मात्र, राज्य सरकारची याबाबत अनिच्छा दिसते.  परंतु, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होत असल्याने राज्य सरकारची इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या  ईसीआर दाखल करू शकते असे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वाढत असताना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, मुंबई पोलिस राजपूत आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत आणि लवकरच ते निष्कर्षापर्यंत पोहचतील. जयंत पाटील म्हणाले, ३४ वर्षाच्या तरुण अभिनेत्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी काही बोलणे उचित होणार नाही कारण तो या जगात नाही.

अधिक वाचा  कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

ते पुढे म्हणाले, सुशांतचे घर असलेल्या बिहार राज्यात मी जे सांगतो आहे त्याबाबत बिहारमध्ये कसा विचार केला जाईल हे मला माहिती नाही. परंतु, महाराष्ट्रातील नेत्यांनी या प्रकरणाबाबत ट्वीट करणे आणि त्याबद्दल आपले मत व्यक्त करणे थांबवावे. जयंत पाटलांनी कुणाचे नाव घेतले नाही परंतु त्यांच्या बोलण्याचा रोख  हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. कारण फडणवीस यांनी ट्वीटद्वारे, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची राज्य सरकारची  इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) याप्रकरणी ईसीआर दाखल करू शकते असे म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love