पुणे— “हम पुना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन में उड़ाने वाले है”, अशी गुगल व्हाईस सर्चद्वारे पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणाऱ्या निरक्षराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय २२, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. प्रभू निरीक्षर असून लोहमार्ग पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल करून पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला काही तासातच लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीवर कलम १८२, ५०५ (१) (ब), ५०६ (२) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभू सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष्ठ आणि उच्च पदस्थ पदाधिकारी आणि राजकीय नेते, मोठे उदयोगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे आणि वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पुणे लोहमार्ग, नियंत्रण कक्षाला २९ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने फोन केला. त्या कॉलवरून त्याने “हम पुना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन में उड़ाने वाले है”, अशी धमकी दिली. या कॉल केल्यामुळे पोलrस अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. कॉल आल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिसांनी अधिक तपास करून आरोपीला अटक केली आहे.