ग्लेनमार्कतर्फे टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज़िटा प्लस पायो औषध लॉन्च


पुणे- भारत ही जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ) नुसार, भारतात मधुमेहाचा प्रसार झालेले सुमारे ७४ दशलक्ष प्रौढ आहे. हा आकडा २०४५ पर्यंत हा आकडा सुमारे १२५ दशलक्ष  म्हणजे जवळपास ७० टक्के वाढ  होऊ शकते . यापैकी ७७ टक्के रुग्णांना अनियंत्रित मधुमेह आहे. मेटफॉर्मिनद्वारे मधुमेह अनियंत्रित असलेल्या आणि  टाईप २ मधुमेहाच्या उपचारांसाठी वापरले जाणारी  औषधे म्हणून टेनेलिग्लिटप्टिन आणि पायोग्लिटाज़ोनचा  डोस घेणे आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या नावीन्यपूर्ण जागतिक औषध कंपनीने टेनेलिग्लिप्टिन व पायोग्लिटाज़ोनचा एकत्रित निश्चित डोस लाँच केला आहे. अशा प्रकारचा डोस तयार करणारी ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे.

अधिक वाचा  लोकसभा २०२४ ची निवडणूक हे खरे काम आणि खोटा प्रचार यामध्ये होणार आहे - प्रकाश जावडेकर

कंपनीने डीपीपी४ इनहिबिटरचे  टेनेलिग्लिप्टिन व पायोग्लिटाज़ोनसह नॉव्हेल फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) तयार केले आहे.  जे अनियंत्रित टाईप २ मधुमेह असलेल्या प्रौढांसाठी हा भारतातील एकमेव उपलब्ध डीपीपी४ आणि ग्लिटाझोन समन्वयक ब्रँड आहे.ज़िटा प्लस पायो या ब्रँडखाली ग्लेनमार्कने एफडीसी लाँच केले आहे. ज्यामध्ये टेनेलिग्लिप्टिन (२०एमजी) आणि  पायोग्लिटाज़ोन    (१५ एमजी) असे प्रमाण आहे. हा डोस दिवसातून एकदा घ्यायचा आहे.  या उत्पादनास भारतीय औषध नियंत्रक जनरलद्वारे (डीसीजीआय ) मान्यता देण्यात आली  आहे.  कंपनीने तयार केलेले निश्चित डोस  हे टेनेलिग्लिटप्टिन आणि  पायोग्लिटाज़ोन   या उपचारांची आवश्यकता   असलेल्या  रुग्णांना उपयुक्त ठरेल त्यामुळे   रुग्णाचे  ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करेल.

β सेलचे कार्य  चांगल्या प्रकारे  काम न करणे आणि इन्शुलिन प्रतिरोधकांमुळे होणाऱ्या समस्यांचा सामना टाईप २ मधुमेहींना करावा लागतो.  मात्र ग्लेनमार्कचे एफडीसी टेनेलिग्लिप्टिन आणि  पायोग्लिटाज़ोन   या दोन सर्वात महत्त्वाच्या  पॅथोफिजिओलॉजीशी सामना करण्यासाठी प्रभावी आहे, जे एफडीसीला अनियंत्रित टाइप २ मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी अधिक प्रभावी बनवते. टेनेलिग्लिप्टिन आणि  पायोग्लिटाज़ोनचे एकत्रीकरण एक समन्वयात्मक दृष्टिकोन पुरवते.  ज्यामध्ये टेनेलिग्लिप्टिन β पेशींची संवेदनशीलता उत्तमरीत्या सुधारेल आणि पिओग्लिटाझोन प्रभावीपणे इंसुलिन प्रतिकार कमी करेल. 

अधिक वाचा  #Disqualification of MLAs : 16 आमदारांचे अपात्रता प्रकरण : अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची गुप्त भेट : विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शिंदे सरकार वाचणार?

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ग्रुपचे उपाध्यक्ष आणि प्रमुख आलोक मलिक म्हणाले की मधुमेहावर ग्लेनमार्कने आधीपासून लक्ष केंद्रित केले आहे. ते आमच्यासाठी प्रमुख क्षेत्र आहे.  भारतातील मधुमेही रुग्णांना नवनवीन उपचार पर्याय उपलब्ध करून देण्यात अग्रणी ठरेल असा  ज़िटा प्लस पायो   हा ब्रँड सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अशा प्रकराचा डोस तयार करणारी ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. या डोसच्या माध्यमातून प्रौढ मधुमेही रुग्णांना जागतिक दर्जाचे आणि परवडणारे उपचार उपलब्ध होत आहेत

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love