#टीईटी परीक्षा गैरव्यवहार : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक: ५०० उमेदवारांना दिले खोटे निकाल: कोट्यावधीचा घोटाळा


पुणे-राज्यातील शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या सायबर युनिटने आज पहाटे संगमनेर (जि. अहमदनगर) छापा टाकत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे( Sukhdev dere) यांना अटक केली आहे. या कारवाईने पेपरफुटीचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यात पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी डेरे यांच्यासह जीए टेक्नॉलॉजीचा (GA technology) प्रमुख अश्‍विनकुमार (ashvinkumar) यालाही बेंगळुरु येथून अटक केली आहे. पाचशे परिक्षार्थीकडून प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये घेऊन जमा झालेले पैसे आपसात वाटून निकालात फेरफार करत परिक्षार्थी व शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्तांसह परीक्षांचे आयोजन करणारे जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बंगळुरुचे तत्कालीन व्यवस्थापक व त्याचे सहकारी यांच्या संगनमताने अपात्र परिक्षार्थ्यांकडून पैसे स्वीकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करुन पात्र दाखविल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी राज्या शिक्षण आयुक्तांना लेखी कळवले होते.त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी तक्रार दिली. त्यानुसार 2018 साली शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीने आयोजित केली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल 12 ऑक्टोबर, 2018 रोजी जाहीर झाला होता. मात्र, त्या निकालापूर्वी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक अश्विन कुमारने परिक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे, तुकाराम सुपे व त्यांच्या सहकारी प्रितीश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ या सर्वांच्या संगनमताने अपात्र असल्येल्या 500 परिक्षार्थींकडून प्रत्येकी सुमारे 50 ते 60 हजार रुपये स्वीकारले. ती रक्कम आपसात वाटून घेत खोटा निकाल प्रसिद्ध करुन परिक्षार्थी व शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष जगताप यांनी दिली.

अधिक वाचा  चंदनाची तस्करी करणाऱ्याला पाठलाग करून अटक: १९० किलो चंदन जप्त

जगताप यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सुखदेव डेरे ( वय 61 वर्षे, रा. संगमनेर, जि. अहमदनगर ) व अश्विन कुमार ( वय 49 वर्षे, कल्याणी नगर, बंगळुरु ), या दोघांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजूरकर व त्यांच्या पथकाने अटक केली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर आलेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने 2017 साली परीक्षांसंबंधी करार केला होता, त्यावेळी सुखदेव डेरे हे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. 2018 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जीए टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीच्या सल्लागार समितीत कार्यरत होते. अटक करण्यात आलेल्या सुखदेव डेरे यांच्याकडील कागदपत्रे, लॅपटॉपमधील माहितीवरुन ही लिंक पुढे आली आहे. तुकाराम सुपे आणि प्रीतिश देशमुख यांच्याकडे केलेल्या तपासात हे समोर आलं आहे,” असे अमिताभ गुप्ता म्हणाले.

अधिक वाचा  ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या अमय रासकरचे चार्ल्स कोरिया सुवर्ण पदक २०२२ पुरस्कारांमध्ये यश

असे केले जात होते उमेदवारांना उत्तीर्ण

२०१८ मध्येही या परीक्षेत आता समोर आलेल्या प्रकरणासारखाच गैरव्यवहार झाला होता. त्यावेळीही जीए टेक्नॉलॉजीकडे परीक्षांसंदर्भात कंत्राट होते. याप्रकरणी एकूण आठ गुन्हेगार आहेत. त्यामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुणपत्रिकेद्वारे हा गैरव्यवहार करण्यात येत होता. गुणपत्रिकेद्वारे हे करता आले नाही तर उमेदवारांना उत्तरपत्रिका रिकामी ठेवण्यास सांगण्यात येत होते. त्यानंतर त्या उत्तरपत्रिकेवर चिन्हाची खूण करुन नापास उमेदवारला कॉम्प्युटरवर नोंद करताना उत्तीर्ण दाखवण्यात येत होते. अशाप्रकारे जवळपास ५०० जणांचे खोटे निकाल दिले आहेत. त्यांनी बऱ्याच प्रमाणात खोटी प्रमाणपत्रेही दिली आहेत. २०१८ मध्ये याप्रकरणी एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण त्याचा अधिक तपास न झाल्यामुळे हे प्रकरणात पुढे कारवाई झाली नाही,” अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

अधिक वाचा  भाजपचे संकल्पपत्र 'विकसित भारता'चा रोड मॅप -माधव भांडारी

प्राथमिक अंदाजानुसार ५०० लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळाली आहे. हा सर्व प्रकार पाच कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे. सुखदेव डेरे दोन ते तीन वर्ष निवृत्त झालेले होते. २०१८ च्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे प्राथमिक माहिती असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love