पुणे – आम्ही अनेक सरकारं पाहिलं, राज्यविषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा. पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही. अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते, असा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केला. निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे परत आले नाहीत त्यामुळे राज्य अस्थिर करण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे असेही ते म्हणाले.
पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले, अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पण 14 ते 15 लोकं 5 दिवस छापे मारतात, त्यांचं काम संपल्यानंतरही त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. एखाद्याच्या घरी इतके लोक पाठवून पाच-पाच दिवस ठेवून दबाव आणला जात आहे. चौकशी झाल्यावर पाहुण्याने जाणे आवश्यक होते. परंतु हा पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते. विशेषतः भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर होताना दिसतो.
निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे काही परत आले नाहीत. तेव्हा राज्य अस्थिर करण्यासाठी ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. काही लोक समर्थन करण्यासाठी पुढे आले. खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात. कधी माजी मुख्यमंत्री, कधी मुंबईचे त्यांचे माजी अध्यक्ष पुढे येतात. अशा प्रकरणात त्या यंत्रणा, त्यांच्या प्रवक्त्यांनी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण भाजपचे नेते पुढे येतात. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्यासाठी सर्व सुरु आहे. हे दिसून येतं असंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केले. 20 वर्षाहून अधिक काळ ते विधिमंडळत होते. पण त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्याविरोधात खटले सुरू झाले. त्यांच्या जावयाविरोधात खटले सुरू झाले, असंही शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत: वर केला
नव्या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे आली होती. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं गेलं. त्यावेळी माझ्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत: वर केला आणि हे नेतृत्व करतील असं जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. त्यांची हातवर करायची तयारी नव्हती आणि मुख्यमंत्री व्हायचीही इच्छा नव्हती. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांना हात वर करायला लावला. मी त्यांचा हातवर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवारांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंना मी वयाच्या तीन चार वर्षापासून पाहिलेलं आहे. बाळासाहेब माझे मित्रं होते. त्यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते. पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब अत्यंत दिलदार होते. या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं. शिवसेनेने योगदान दिलं. त्यामुळे जेव्हा सरकार बनविण्याची वेळ आली तेव्हा तीन पक्ष समोर होते. त्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे होते. त्यामुळे आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला भाग पाडावा ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे मी त्यांचा सक्तीने हात वर केला. त्यामुळे त्यांची निवड झाली. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं, असं त्यांनी सांगितलं.
पण माझी फडणवीसांना विनंती आहे की कृपा करून असल्या गोष्टीवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. तुम्ही पाच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत काम केलं. त्यामुळे त्यांना परस्परांचा परिचय निश्चित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर आरोप करणं योग्य नाही. म्हणून मी मुद्दाम ही वस्तुस्थिती सांगितली, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करणं योग्य नाही
महाराष्ट्र सरकारकडून कोळसा पुरवठा करण्यासाठीचे 3 हजार कोटीचा रुपये आले नाही. त्यामुळे केंद्राला अडचणीला तोंड द्यावं लागत असल्याने कोळसा पुरवठा करण्यात आला नसल्याचं सांगितलं. मी याबाबतची माहिती घेतली. 3 हजार कोटी देणं आहे हे खरं आहे. त्यातील 1400 कोटी रुपये आज किंवा उद्या सरकार देणार आहे. महाराष्ट्राकडून कोळशाची किंमत द्यायला उशीर झाला म्हणून आरोप करतात. दुसऱ्या बाजूला जीएसटीची 35 हजार कोटीचं देणं केंद्राकडे आहे. ते देत नाही. एका बाजूला 35 हजार कोटी रुपये थकवायचे आणि तीन हजार कोटीसाठी कोळसा पुरवठा करायचा नाही. महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले.
रविंद्रनाथ टागोर – शुभाषचंद्र बोस यांच्यासारखे नेतृत्व फडणवीस यांना महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाहीत का?
“महाराष्ट्राचा बंगाल म्हणजे काय. पश्चिम बंगाल हे देशाचे महत्त्वाचे राज्य आहे. देशाचा इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल हे राज्य नेहमी एकत्र असतात. राष्ट्रगीतातही हे तीन राज्य एकत्र आहेत. महाराष्ट्राचा बंगालशी संबध अत्यंत जवळचा आहे. बंगाली आणि मराठी भाषा अत्यंत जवळची आहे. स्वातंत्र्यलढ्यात बंगालमधील रविंद्रनाथ टागोर तसेच सुभाषचंद्र बोस यांनी जे योगदान दिलं तेच योगदान लोकमान्य टिळक तसेच तत्सम नेतृत्वाने दिलं. हा महाराष्ट्र आणि बंगालचा इतिहास आहे,” असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना मराठी आणि बंगाली भाषेतील साम्य सांगण्यासाठी ‘मला बंगाली भाषेत बोलता येत नाही’ या वाक्याला बंगाली भाषेत कसं म्हणावं हेसुद्धा त्यांनी सांगितलं.
मी दोन ते तीन दिवस बंगालमध्ये राहिलो तर मलासुद्धा बंगाली भाषा समजेल. बंगालमधील रविंद्रनाथ टागोर तसेच शुभाषचंद्र बोस यांच्यासारखे नेतृत्व तसेच कवी फडणवीस यांना महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाहीत का ? असा सवालदेखील त्यांनी फडणवीस यांना केला.
पवार जे करतात त्या कडे इतरांचे सगळ्यांचेच लक्ष असते.
पवार’ जे करतात त्या कडे इतरांचे सगळ्यांचेच लक्ष असते. त्यामुळे आम्हा पवारांना कुठल्या कार्यक्रमाची जाहिरात करण्याची गरजच पडत नाही; असे मिश्किल वक्तव्यही पवार यांनी यावेळी केले .आपले नातू आ.रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात खर्डा इथे सर्वात उंच असा भगवा ध्वज उभारलाय, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष भगव्या कडे वळतोय का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांनी ‘पवार’ जे काही करतात त्या कडे सर्वांचे लक्ष असते, त्याचा आम्हाला फायदाही असा होतो की आमची प्रसिद्धी कुठलीही जाहिरात न करता होते. हे सांगतानाच पवारांनी आ.रोहित पवार यांच्या भगवा स्वराज्य ध्वज संकल्पना विषद करत आ.रोहित यांचे समर्थन केले.भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याचे प्रतीक आहे. त्याग, समता,समर्पण, निष्ठा ही आपली संस्कृती आहे. भगव्या कडे संकुचित वृत्तीने न पाहता व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. आपला इतिहासात भगव्या ध्वजाला महत्व आहे, त्यामुळे याकडे कोणी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू नये असे शरद पवार म्हणाले.