संजय राऊत इंग्लंड,अमेरिकेच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात – चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पंढरपूर- बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, “नितीनजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात असे म्हणत बेळगावात कोणत्याही पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये असे आवाहन केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना उपरोधात्मक टोला लगावला आहे.

संजय राऊत कोणालाही सल्ला देऊ शकतात. अगदी अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात त्यामुळे ते गडकारींनाही सल्ला देऊ शकतात, आम्ही सामान्य माणसे आहोत असे ते म्हणाले.

भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी  “गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराच्या विरोधात बेईमानी नको. बेळगावात मराठी माणसाची एकजूट आणि त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न नको. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका”, असे आवाहन केले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *