सोशल मीडिया, विविध अॅपद्वारे ओळख वाढवत तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या नातेवाईकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक


पुणे— सोशल मीडिया, विविध अॅप, ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना मोह दाखवत तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 53 जणींना  2 ते 3 लाखाला गंडा घालणाऱ्या भामट्याला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या  भामट्याने 4 तरुणीसोबत घरोबा करून आर्थिक गंडा घालणाऱ्या व तब्बल 53 तरूणींना लग्नाचे आमिष दाखवून बोलणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.फसवणूक झालेल्या एका तरुणीने पोलिसांत फिर्याद दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी योगेश दत्तू गायकवाड (वय २७ रा.मु.डोंगरगाव, ता.कन्नड जि.औरंगाबाद) व त्याचा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (वय ३८, रा. केडगाव ता.जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  या प्रकरणावरून एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस फिर्याद दिली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीकडून आर्मीचे कपडे, खोटे शिक्के, बनावट बिल्ले, टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जाणाऱ्या टोप्या तसेच खोटी जॉइनिंग लेटर्स व एक चारचाकी गाडी,दोन दुचाकी गाड्या असा एकूण ५,४१,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक वाचा  जगातील सर्वाच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर समाेर हेलिकाॅप्टरमधून पदमश्री शीतल महाजन मारणार ऐतिहासिक पॅराशूट जंप : जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ठरणार लँडिग करणारी जगातील पहिली महीला

जानेवारी 2020 मध्ये फिर्यादी तरुणी (रा. मूळची आळंदी देवाची) ती आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रुग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपीचे (योगेश गायकवाड ) आधारकार्ड तरुणीला सापडले होते. यानंतर त्या फिर्यादी तरुणीने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत चांगलीच ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास वाढवला. त्यानंतर आरोपी योगेश गायकवाडने आर्मीमध्ये मोठी भरती निघाल्याचे सांगत फिर्यादीच्या भावाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फिर्यादीच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या गावातील नातेवाईकांचा व गावाबाहेरील तरुणांचा विश्वास संपादन करत त्यांना आर्मीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या भावाचे व इतर काहीजणांची खोटे जॉईनिग लेटर दाखवत फसवणूक करून विश्वासघात केला.

अधिक वाचा  लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

यानंतर त्या आरोपी योगेश गायकवाड  तरुणीबरोबर खोटा विवाह करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली. ते रुपये देखील त्याला मिळाले. यानंतर त्या तरुणीच्या गावातील युवकांचा विश्वास संपादित करून आरोपी योगेशने आतापर्यंत 53 तरूणींबरोबर ओळख वाढवून प्रत्येकी 1 लाख रूपये प्रमाणे 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने लॉकडाऊनचे कारण सांगत नातेवाईक, मित्रमंडळी यांना लष्कर भरतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे आणि  भटजी विना बंद खोलीत आतापर्यंत चार मुलींशी लग्न केले आहे. तसेच एका पत्नीला त्याच्यापासून 2 अपत्ये आहे. तो आणखी ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love