मुकेश अंबानी यांनी केली ‘जिओ फोन नेक्स्ट’या फीचर स्मार्टफोनची घोषणा:गणेश चतुर्थीपासून होणार बाजारात उपलब्ध


मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘जिओ फोन नेक्स्ट’ या गुगल आणि जिओ टीमने संयुक्तपणे विकसित केलेल्या फीचर स्मार्ट फोनची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली. येत्या गणेश चतुर्थीपासून ( 10 सप्टेंबर) हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त फीचर स्मार्टफोन असेल असा दावा त्यांनी केला आहे.

वापरकर्ते भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर गुगल प्लेवरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा या स्मार्टफोनला मिळतील.

रिलायन्स जिओने गेल्या वर्षी गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई नवीन स्मार्टफोनविषयी म्हणाले, आमचे पुढचे पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणाऱ्या स्मार्टफोनपासून सुरू होत आहे. हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.

अधिक वाचा  जिओचा ग्राहकांसाठी धमाका:नवीन जिओफोन 2021 ऑफर

जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर रिलायन्स जिओ बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये एवढा आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love