पुणे : पुण्याजवळील सासवड येथे मंगळवारी महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर आज( बुधवार) कात्रज बोगद्याजवळ तिच्या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांचाही खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. पिकनिकसाठी हे कुटुंब बाहेर पडले होते. मायलेकांचे मृतदेह हाती लागल्याने त्यांचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले असले तरी आलिया शेख यांचे पती आबीद शेख हे मात्र अद्याप बेपत्ता असल्याने या खुणांचे गुढ वाढले आहे. तर आलिया यांचे पती आबीद शेखही गायब असल्यामुळे गुंता वाढला आहे.
हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे आहे. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रिझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटुंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं, पण काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत आठ ते दहा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच काल सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला, त्या आलिया यांचा तो अयान नावाचा मुलगा असल्याचं उघड झालं.या दोन्ही मृतदेहांच्या शरीरावर जखमा आढळल्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले असावेत. असा अंदाज वर्तविला जात आहे
.आबीद शेखने पुणे -सातारा रस्त्यावरील चित्रपट गृहाजवळ पार्क केल्याचे सीसीटीव्हीत कैद
महिलेच्या खूनप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याच्या शोध सुरू केला असता, चारचाकी गाडी पुणे-सातारा रस्त्यावरील एका चित्रपटगृहासमोर आढळली आहे. त्यामुळे या खून प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पोलिसांकडून कसुन शोध सुरू झाला. या दरम्यान बेपत्ता असलेल्या महिलेचा पती आबिद शेख याने (दि. 11 जून) रोजी ही कार भाड्याने घेतली होती. ही कार घेऊन तो आलिया आणि आयान यांच्यासह पिकनिकला गेला होता. यावेळी सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आबिद शेख सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला आल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे.
तिघेजण धानोरी येथून सकाळी गाडी घेऊन बाहेर फिरण्यास पडल्यानंतर ते दिवे घाटमार्गे सासवडला गेले. यानंतर ते नारायणपूर आणि केतकावळे येथील बालाजी टेम्पल आणि परत दिवे घाटात आले. परत पुन्हा सासवड याठिकाणी गेले. तेथून सासवडकडून परत कात्रज घाट येथे आले. त्यानंतर जुना बोगदा आणि नवीन बोगदा मार्गे सातारा रस्त्यावर कार आली असल्याचे समोर आहे. जी ब्रिझा कार रेंटवर घेण्यात आली होती ती व्यवसायिक कंपनीची कार होती. त्या कारला जीपीएस सिस्टीम बसवलेली होते. त्यातून हा प्रकार समोर आला आहे.
आबीद शेख हे एका कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतात. पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय झालं? आई-मुलाची हत्या का झाली? तसंच आबीद शेख कुठे आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.