मुंबई- मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या आता काहीशी आटोक्यात येत चालली आहे. अश्या स्थितीतही अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. गोरेगाव या ठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी अनेक कॊरोना रुग्णांना जीवदान दिले आहे.
गोरेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड क्र.५४ चे अध्यक्ष राहुल ठोके यांनी कॊरोना काळात अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड त्याच बरोबर इतर वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे गोरेगाव वॉर्ड क्र.५४ चे अध्यक्ष राहुल ठोके यांच्याकडे असंख्य लोकांचे मदतीसाठी फोन येत असतात. रात्री अपरात्री ते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मदत करायला जातात. मग ती मदत त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर असली तरी ते मागे हटत नाही. सध्याच्या कॊरोना काळात कोणाला व्हेंटिलेटर तर कोणाला ऑक्सिजन बेड तर कोणाला प्लाझ्मा पाहिजे असतो, तर अनेकजण हॉस्पिटलचे बिल कमी करण्यासाठी त्यांच्याकडे फोन करतात. अश्या परिस्थितीत कोणतीही वेळ न पाहता राहुल ठोके आपली टीम घेऊन निघतात. रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करीत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळवून दिला आहे. असे अनेक उदाहरणे देता येतील. अनेकांना फोनवरून तर काहिनं प्रत्यक्षात भेटून ते मदत करत असतात.