हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं

The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents

पुणे—बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर गंगा नदीमध्ये 100 पेक्षा जास्त  मृतदेह तरंगताना आढळल्याणे खळबळ उडाली आहे. येथील घाटावर रोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेवरून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं तसेच दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते अशी टीका त्यांनी केली आहे.

बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची चक्क नद्यांमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोना ग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटिहार येथेही कटीहार नदीत काही मृतदेह आढळलेले आहेत.याबाबत स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती. मृत्यूचं भांडवल करणं त्यांनाच जमतं. असा उपरोधिक टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का?