कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

Spread the love

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. जगामध्ये भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटाबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. आता गुगलचे सीइओ सुंदर पिचाई यांनीही भारताला धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. सीएनएन या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवले आहे.

अधिक वाचा  370 वे कलम झाल्यानंतर काश्मीरमधील दोडा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 70 टक्के जनतेने सहभाग घेतला - डॉ. सागर डोईफोडे

 कोरोना स्थितीचा वाईट काळ भारतात येणे अजून बाकी आहे. कोरोनामुळे भारताची सध्या बिकट अवस्था आहे. भारताला अमेरिकेकडून मदत मिळत असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लोकांना खरी आणि योग्य माहिती देण्यावर आमचे लक्ष असल्यामुळे लोकांना मदत मिळेल, असे त्यांनी गुगल कंपनी भारतासाठी काय करते? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने केली आहे. ही घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांनी केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दुसऱ्या लाटेत वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  एडविन रॉबर्ट्स यांचे कोरोनाने निधन

भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी दिले आहे. भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी मागील अनेक आठवड्यांपासून अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love