पुणे- महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता? नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो, आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळू शकलो असतो असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे.
‘लसीची उपलब्धता वाढली पाहिजे’राज्यात लसीकरण मोहिमेत कुठलाही गोंधळ नसून प्रशासनाने लसीकरण उत्तम प्रकारे राबवले आहे. मात्र लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. असे पाटील म्हणाले. सध्याची परिस्थिती पाहता सर्वांना लस मिळेपर्यंत तीन ते चार महिन्यांचा कलावधी जाणार आहे असे पाटील म्हणाले. मोफत लसीकरणाबाबत एकत्र बैठकीत निर्णय घेतला जाईल आणि नंतर मुख्यमंत्री जाहीर करतील, असे देखील त्यांनी संगितले.