पुणे—कोरोनाची लक्षणे आढळल्याने तपासणी करण्यास सांगूनही तपासणी न करता एका 65 वर्षीय नागरिकाने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येतह घडली आहे.
प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असं आत्महत्या केल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांना मागील चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळं स्थानिक रुग्णालयात त्यांना कोरोना तपासणी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी काल भिगवण येथील त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाबद्दल भीती मनात न ठेवता तातडीने तपासणी करून उपचार करावेत असं आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केलं आहे.