पुणे -एफ१९ प्रो सिरीजच्या यशस्वी लाँचनंतर ओप्पो या आघाडीच्या जागतिक स्मार्ट डिवाईस ब्रॅण्डने १७ मार्च २०२१ पासून एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो ची विक्री सुरू होण्याची घोषणा केली. एफ सिरीज वारसा कायम ठेवत एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो सर्वोत्तम तंत्रज्ञान व आकर्षक सडपातळ डिझाइनसह तुमची वैयक्तिक स्टाइल व स्पीडसंदर्भातील गरजांना अनुसरून डिझाइन करण्यात आला असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
एफ१९ प्रो + ५जीमध्ये एआय हायलाइट पोर्ट्रेट व्हिडिओ, स्मार्ट ५जी, ५० वॅट फ्लॅश चार्ज आणि ओप्पोचे प्रोप्रायटरी सिस्टम परफॉर्मन्स ऑप्टिमायझर अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये ग्राहकांच्या मध्यम-विभागातील स्मार्टफोनबाबतच्या अपेक्षांमध्ये बदल करतात.
ओप्पो एफ१९ प्रो + ५जी २५,९९० रूपये किंमतीमध्ये उपलब्ध आहे आणि ओप्पो एफ१९ प्रोची किंमत २१,४९० रूपये (८ +१२८ जीबी) व एफ१९ प्रोची किंमत २३,४९० रूपये (८ +२५६जीबी) आहे. १७ मार्चपासून या स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरूवात होत आहे. ओप्पो एफ१९ प्रो प्लस ५जी ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजसह स्पेस सिल्व्हर व फ्लूइड ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये येईल. ओप्पो एफ१९ प्रो + ५जी प्रमुख रिटेलर्स व अॅमेझॉनवर उपलब्ध असेल, तर ओप्पो एफ१९ प्रो प्रमुख रिटेलर्स, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर प्रमुख ई-कॉमर्स व्यासपीठांवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध असेल.
या अत्यंत सडपातळ फोनचे आकारमान ७.८ मिमी x ७३.४ मिमी x १६०.१ मिमी आहे आणि १७३ ग्रॅम इतके अल्ट्रा-लाइट वजन आहे. मागील बाजूस असलेल्या वन-पीस क्वॉड कॅमे-यावर गोरिला ग्लास ५च्या सिंगल पीसचे कव्हर आहे, जे कॅमे-याला आकर्षक लुक देण्यासोबत कोमल स्पर्शाचा अनुभव देते. २४०० x १०८० एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आणि ९०.८ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशोच्या माध्यमातून एफएचडीमध्ये अधिक सुस्पष्ट व्हिडिओज पाहण्याचा व गेम्स खेळण्याचा आनंद मिळतो. तुमच्या गतीशील जीवनशैलीला अनुसरून फोनमध्ये ४,३१० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जिच्यासोबत ५० वॅट फ्लॅश चार्ज तंत्रज्ञान येते. ज्यामुळे तुम्हाला फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५ तासांचा टॉकटाइम, ३.५ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि १.५ तास इन्स्टाग्राम वापरण्याची खात्री मिळते. ओप्पो एफ१९ प्रो + ५जी अत्यंत सानुकूल, कार्यक्षम, इंटेलिजण्ट आणि वैशिष्ट्यांसह डिझाइन करण्यात आलेली अँड्रॉइड आधारित मोबाइल ओएस कलरओएस ११.१ वर संचालित आहे, ज्यामधून सुलभ व कार्यक्षम अनुभव मिळतो. तसेच मीडियाटेक डायमेन्सिटी ८००यू प्रोसेसरमधून डिवाईसला अधिक शक्ती मिळण्याची खात्री मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे.