जालण्यातून दानवेंना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही:जावई हर्षवर्धन जाधव यांचं खुलं आव्हान


औरंगाबाद – भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यावर आणि त्यांच्या महिला सहकारी ईशा झा यांच्यावर वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या महिला सहकारी ईशा झा यांचा विनयभंग झाल्याची तक्रार केली होती. न्यायालयाच्या सांगण्यावरून याबाबत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामीन मिळाल्यानंतर राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी आज कन्नड शहरातील शासकीय विश्रामगृहात त्यांच्या सहकारी ईशा झा यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांना खुलं आव्हान दिले आहे. आपण राजकारणात परतणार असून जालण्यातून दानवेंना पाडल्याशिवाय आणि घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आव्हान त्यांनी दिले. त्यामुळे सासरे आणि जावयाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अधिक वाचा  जरांगे पाटलांनी करून दाखवले

रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप करताना जाधव म्हणाले, पुण्यामध्ये घडलेल्या घटनेत पोलिसांनी दानवे यांच्या दबावामुळे पोलिसांनी चुकीचा गुन्हा नोंदवला. न्यायालयाने हा चुकीचा गुन्हा असल्याचे सांगून मला जमीन दिला आहे. या अगोदर दणवे यांनी माझ्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नंतर वाद, भांडणे नको म्हणून मी राजकारण सोडून समाजकारण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दानवे मला जगू देत नाहीत. त्यामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असून दानवे यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love