मुंबई- जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येबाबत धाक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. शीतल यांनी कुत्र्यासाठीचे इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांनी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र, तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी घरच्या पाळीव कुत्र्यासाठी मागवण्यात आलेल्या पाच इंजेक्शनपैकी एक इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाच इंजेक्शनपैकी एक इंजेक्शन डॉ. शीतल यांच्या मृतदेहाच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली.