पुणे- रस्त्याच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकीवरून खाली पडलेल्या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली. सप्तशृंगी पोलिसांनी या प्रकरणी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
देवाशीष विद्यानंद सक्सेना (वय 26) आणि तेजस त्रिदेव शर्मा (वय 24) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आठ नोव्हेंबर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असताना या दोन तरुणांची मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी जेपी इंटरप्राईजेस इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या कंपनीच्या व्यवस्थापक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील गणराज चौकातून राधा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर खड्डा खोदला आहे. या अर्धवट खोदलेल्या खड्डा जवळ कोणतीही बारीक बॅरिकॅड, दिशादर्शक फलक, इंडिकेटर अथवा वार्डन न नेमून हलगर्जीपणा करण्यात आला होता.
त्यामुळे 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मयत देवाशीष सक्सेना हा मित्रासह दुचाकीवरुवरून जात असताना दुचाकी या खड्ड्यात पडून अपघात झाला आणि दोघेही यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगावे करीत आहेत.