व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार करून मटका जुगार – तिघांना अटक


पुणे—व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार करून मटका जुगार चालवणाऱ्य हॉटेल मालकाला आणि त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३३ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल, असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हॉटेल मालक इंद्रजीत जर्नाधन भोईर (वय- ३२ रा. सावंतनगर, आळंदी), पवन चुडामन ठोकर (वय ४० रा. बौद्ध नगर पिंपरी), स्वप्नील रामेश्वर (वय २१ रा. काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील भोसरीमध्ये हॉटेल मालक व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार करून त्यावर मोठ्या प्रमाणावर मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, नितीन खेसे आणि विशाल भोईर यांच्या पथकाने भोसरीमधील हॉटेल मयुरेशचे मालक इंद्रजीत भोईर याला ताब्यात घेतले.भोईरचा मोबाईल तपासून पाहिला असता मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर अवैद्यरित्या मटका जुगार चालवत असल्याचे समोर आले. याप्रकरणी मालकासह इतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  लग्नात हुंडा मिळेल आणि तोपर्यंत भीक मागण्यास लावता येईल म्हणून केले 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण : महिलेला अटक