अमेरिकेचा इराणवर भीषण हवाई हल्ला; कतारमधील शांतता चर्चेदरम्यान युद्धाचा वणवा पेटला

इराण-अमेरिका हवाई हल्ला
इराण-अमेरिका हवाई हल्ला

तेहरान -मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यामुळे आखाती देशांत युद्धाचा वणवा पुन्हा पेटण्याची भीती निर्माण झाली आहे। कतारची राजधानी दोहा येथे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघटी सुरू असतानाच अमेरिकेने दक्षिण इराणमधील ‘बंदर अब्बास’ या मुख्य नौदल तळाजवळ ही मोठी लष्करी कारवाई केली आहे। या अनपेक्षित हल्ल्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून इराणनेही आता युद्धाची तयारी सुरू केल्याचे वृत्त समोर येत आहे।

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला स्वसंरक्षणार्थ करण्यात आला असून यामध्ये इराणमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ आणि सागरी मार्गात स्फोटके ठेवणाऱ्या बोटींना लक्ष्य करण्यात आले। या भीषण हवाई हल्ल्यात बोटींवरील इराणचे चार सैनिक ठार झाले आहेत। एकीकडे इराणसोबत तात्पुरता युद्धविराम झालेला असतानाही अमेरिकेने इस्रायलमधील आपले लष्करी बळ कमी केलेले नाही, उलट नौदल तळांनजीक हल्ले करून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे। या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेचे प्रगत ‘एम क्यू ९ रिपर’ (MQ-9 Reaper) ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे।

अधिक वाचा  राष्ट्रवादीने भाजपशी लग्न केलेले नाही - छगन भुजबळ

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

या लष्करी संघर्षाचा मोठा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असून, दोन्ही देशांमधील या कुरघोडीमुळे जगासमोर मोठी इंधन कोंडी निर्माण झाली आहे। इराणने आपली लष्करी सज्जता वाढवण्यासोबतच मुस्लिम देशांना एकत्र आणण्याची रणनीती आखली आहे।

दूसरीकडे, कतारमध्ये सुरू असलेल्या चर्चेत एक महत्त्वाचा प्रस्ताव समोर आला आहे। जर अमेरिका इराणची सागरी नाकेबंदी हटवण्यास तयार झाली, तर त्या बदल्यात इराण ‘हॉर्मुझ’ (कोरमूत) जलमार्ग व्यापारासाठी खुला करणार आहे। या संभाव्य सामंजस्य करारावर दोन्ही देश भविष्यात कशी अंमलबजावणी करतात आणि हा संघर्ष थांबतो की अधिक चिघळतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे।

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love